Friday, February 26, 2021
Home India News २०२१ साठी आपला मंत्र दवाई भी और कडाई भी

२०२१ साठी आपला मंत्र दवाई भी और कडाई भी

भारतात सध्याच्या घडीला उत्पादन होत असलेल्या लसीमध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड, झायडस कॅडीलाची झायकॉव डी, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि डॉ. रेड्डीज लॅब बनवत असलेली स्पुटनिक 5 या लसी आहेत. यापूर्वी व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी भारतातल्या कोल्ड स्टोरेजच्या व्यवस्थेबद्दल बोलताना लसी साठवण्यासाठी २ ते ८ डिग्री तापमानाच्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था झालेली आहे असे म्हटलं होते. वर उल्लेख केलेल्या लसी या तापमानात साठवता येऊ शकतात त्यामुळे यापैकी जी लस सुरक्षितता आणि परिणाम कारकतेच्या निकषांवर उत्तीर्ण होईल तिला मान्यता मिळू शकते असं मानता येईल. मॉडर्ना किंवा फायझरच्या लशींच्या साठवणुकीसाठी अल्ट्रा कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला ती सुविधा भारतात उपलब्ध नाही. पण या कंपन्यांशीही संपर्क करणार असल्याचं आणि त्या लसीचंही उत्पादन पुढे भारतात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं डॉ. व्ही. के. पॉल रॉयटर्स एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते.

भारतातील कोरोना लसीकरणाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. देशातील लोकांना भारतात उत्पादित झालेली लस मिळेल, मोदींनी गुजरातच्या राजकोट इथल्या AIIMSच्या कोनशिलेचं व्हर्चुअल अनावरण केले, यावेळी ते बोलत होते. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या खालावत आहे. पुढच्या वर्षी जगातील सगळ्यात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम आपला देश राबवणार आहे. आयुषमान भारत योजनेमुळे गरीब जनेतेचे ३० हजार कोटी रुपये वाचले, असेही मोदींनी म्हटले आहे. पुढे ते म्हणतात, याआधी मी म्हणायचो दवाई नही तो ढिलाई नही, दवाई भी और कडाई भी. आता २०२१ साठी आपला मंत्र दवाई भी और कडाई भी असा असेल.

२०२० साल हे कोरोना सारख्या महामारीच वर्षं म्हणून सर्वांच्या लक्षात राहील. या वर्षात जगभरात कोरोनाने १५ लाखाहून अधिक लोकांचे मृत्यू झाले. भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १ लाख ४० हजारांच्या वर गेली आहे. आपण २०२० संपवून २०२१ मध्ये प्रवेश करत आहोत तर त्याचं श्रेय कोव्हिड योद्धांनाच आहे यात दुमत नाही. पोलीस प्रशासन, नर्स, हॉस्पिटल्स कर्मचारी, औषध निर्माते, औषध विक्रेते आणि डॉक्टर्स यांनी अहोरात्र झटून गेल्या वर्षभरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचा काटोकाट प्रयत्न केला आहे, वर्षाचा आजचा शेवटचा दिवस कोरोनाच्या काळात काम करणारे लाखो डॉक्टर्स,  सफाई कर्मचारी,  औषध दुकानातील कर्मचारी या सगळ्यांना धन्यवाद देण्याचा आहे असं मोदी आवर्जून म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments