Sunday, March 7, 2021
Home India News शेतकर्यांनी आंदोलन संपवावं – नरेंद्र मोदी

शेतकर्यांनी आंदोलन संपवावं – नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, २१ वं शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतानं अनेक देशात कोरोना लस पाठवली आहे. संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटतो. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे. कोरोना काळात नागरिकांचे मनौधैर्य वाढवणाऱ्या उपक्रमाची चेष्टा करण्यात आली, अशा संकटाच्या काळात तरी विरोधकांनी राजकारण करू नये.

भारताची लोकशाही स्वार्थी आणि आक्रमक नाही. भारतात विदेशातून विक्रमी गुंतवणूक होत आहे. गरिबीमुक्त भारतासाठी प्रयत्नशील आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक जगानं पाहिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली असून लहान भूधारक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही’. निवडणुका आल्यावर कर्जमाफीचा मुद्दा येतो. कृषी मंत्र्यांनी केलेल्या प्रश्नाला कुणी उत्तर देत नाही. शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर सर्वांचं मौन आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतींचं अभिभाषण मार्ग दाखवणारं ठरलं आहे. संपूर्ण विश्व संकटांचा सामना करत आहे. कोरोना संकटाचा कुणी विचारही केला नसेल अशा काळात आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. “दिवा लावण्याच्या उपक्रमाची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. विरोध जरूर करावा त्यासाठी अनेक मुद्दे आहे. मात्र देशाचं मनोबल तोडणार विरोध नको”, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अपील केली की, आंदोलनामध्ये वृद्ध लोकही बसले आहेत. त्यांचाही विचार करा आणि आंदोलन संपवा. आपण सोबत मिळून चर्चा करू आणि मार्ग काढू. काही सुधारणा करण्यासाठी आम्हाला संधी द्या. याशिवाय मोदी म्हणाले की, सभागृहाची पवित्रता समजून घ्या. ज्या ८० कोटी लोकांना स्वस्त धान्य मिळते, ते सुरूच राहील. लोकसंख्या वाढत आहे आणि जमीन कमी होत आहे. आपल्याला असे काही करायचे आहे की, शेतकऱ्यांवर सर्व भार पडता कामा नये. आपण, राजकारणात अडकलोत, तर काहीच होणार नाही. बजेट सत्राच्या कारवाईदरम्यान आतापर्यंत गोंधळच झाला. विरोधक सतत सत्ताधाऱ्यांना कृषी कायद्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत होते. एक वेळ तर अशी आली की, उपराष्ट्रपती आणि सभापती वैंकया नायडून यांना विरोधकांना म्हणावे लागले, चुकीचे उदाहरण देऊ नका. लोकांची दिशाभूल करू नका आणि कृषी कायद्यावर चर्चा झालीच नाही, असे म्हणू नका. मतदान झाले होते आणि सर्व पक्षांनी आपली बाजू मांडली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments