फोर्ब्स ने यावर्षीची जगातील पॉवरफुल महिलांची यादी जाहीर केली आहे. १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’ मध्ये ३० देशांमधील महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सनं म्हटलं आहे की, यामध्ये दहा देशांच्या प्रमुख, ३८ सीईओ आणि पाच मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. भले त्या वयाने, राष्ट्रीयतेने आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील मात्र २०२० सालात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश आहे. या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल अव्वल स्थानी आहेत. न्यूझीलॅंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. ज्यांनी कोरोनाच्या संसर्ग काळात आपल्या देशात कडक नियमावली करून आपल्या देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून वाचवले. निर्मला सीतारमण या यादीत ४१ वे स्थान पटकावले आहे. तर एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा ५५ व्या तर किरण मजूमदार शॉ ६८ व्या स्थानी आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत ९८ व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल सलग दहाव्या वर्षीही पहिल्या स्थानावर टिकून आहेत.
जगातील १०० प्रभावशाली महिला फोर्बसने आज जाहीर केल्या.
Announcing the World's 100 Most Powerful Women of 2020: https://t.co/fSEkDPz9Nh #PowerWomen pic.twitter.com/8u6uB1LTYI
— Forbes (@Forbes) December 8, 2020
फोर्ब्सने सांगितलं की, तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन ३७ व्या स्थानी आहेत. त्यांनी जानेवारी महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी एक कार्यक्रम लागू केला. त्यामुळं आज २.३ करोड लोकसंख्येच्या या देशात केवळ ७ मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.
फोर्ब्सनं म्हटलं आहे की, मर्केल यूरोपातील प्रमुख नेत्या आहेत. जर्मनीला आर्थिक संकटातून सावरत त्या क्षेत्रातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं त्या नेतृत्व करत आहेत. त्यांनी आपले यादीतील प्रथम स्थान गेल्या १० वर्षापासून अबाधित ठेवले आहे.
या यादीत बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहअध्यक्षा मिलिंडा गेट्स पाचव्या स्थानावर, अमेरिकन सदनाच्या स्पीकर नैंसी पेलोसी सातव्या स्थानावर, फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सॅंडबर्ग २२ व्या स्थानावर, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ३९ व्या स्थानावर, ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय ४६ व्या स्थानावर, सुप्रसिद्ध कलाकार रिहाना ६९ व्या स्थानावर आणि बेयोंसे ७२ व्या स्थानावर यांचा समावेश आहे.