Sunday, March 7, 2021
Home India News घरबसल्या लायसन्स काढणे झाले सोपे

घरबसल्या लायसन्स काढणे झाले सोपे

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने लायसन्स काढण्याच्या आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहेत. अलिकडे ऑनलाइन लर्निंग लायसन्समुळे सुटसुटीतपणा आला असला, तरी लायसन्स मिळवण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. तिथे तारीख मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते. डिजिटल इंडियाचा भाग म्हणून यापुढे लायसन्स काढण्याच्या विविध प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होणार असून अनेकांना घरबसल्या लायसन्स मिळवणं शक्य होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांनी या सुविधेची सुरुवात केली आहे. यामुळे येथील नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.

कोणतेही दुचाकी अथवा ४ चाकी वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. परंतु या कोरोनाच्या काळात नागरिकांना आरटीओ कार्यालयात येणं शक्य होत नाही. ऑनलाईन लायसन काढणे प्रशासनाने सोपे केले आहे. पाहूया काय आहे त्यांची प्रक्रिया.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी प्रक्रिया –

सर्वप्रथम parivahan.gov.in वेबसाईटवर जाउन त्यानंतर Driving License Related Services हा पर्याय निवडा. Apply online बटनावर क्लिक करून त्यातील New Learners License पर्याय निवडा. यामध्ये विविध राज्यांच्या यादीमधून तुम्ही राहत असलेलं राज्य निवडा. Apply Driving License ओपन झाल्यानंतर यात विचारलेल्या माहिती बरोबर हवी असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लगेच ऑनलाईन पद्धतीने फी भरावी लागणार आहे. यानंतरच वेळचा स्पॅम मिळणार आहे. याचबरोबर ऑनलाईन परीक्षेची तारीख देखील निवडू शकता. लर्निंग लायसन्सची परीक्षा पास झाल्यानंतर जिल्हा आरटीओ कार्यालयात ते मिळण्याची वाट पाहत बसण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील हे लायसन्स डाउनलोड करू शकता. यामुळे लाईनमध्ये वाट पाहत उभं राहण्याची गरज नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अनेक राज्यांमध्ये केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत. यापुढे आरटीओ कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सारख्या राज्यांमध्ये केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जात आहेत. याचबरोबर अनेक विविध नियमांमध्ये आणि पद्धतींमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

लर्निंग लायसन्सची वैधता सहा महिने असते. त्यानंतर त्याचे एकदाच नूतनीकरण करता येते. ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी तीन वर्षांची कालमर्यादा असते. ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकाच्या लायसन्सची वैधता एक वर्षे असते. त्यानंतर एक दिवसाचे उजळणी प्रशिक्षण पूर्ण करून लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते. नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्सची वैधता लायसन्स मिळालेल्या दिवसापासून २० वर्षे किंवा वयाची ५० वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments