Friday, February 26, 2021
Home India News काय आहे मिशन हायड्रोजन

काय आहे मिशन हायड्रोजन

भारत स्वतः हायड्रोजन गॅसची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांच्या मते देशातील अनेक मोठे उद्योगपती या प्रकल्पासाठी एकत्र येऊ शकतात. या उद्योगपतींमध्ये टाटा, अंबानी आणि महिंद्र यांचा समावेश असू शकतो. याशिवाय इंडियन ऑईल आणि आयशर सारख्या कंपन्याही यात मोठी भूमिका बजावू शकतात. कोणत्याही एका कंपनीला इतके मोठे मिशन सुरू करणे शक्य वाटत नाही, म्हणूनच या मोठ्या कंपन्यांना एकत्र येण्याची शक्यता आहे. यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असेल आणि जेव्हा अशा क्षेत्रातील कंपन्या त्यासाठी एकत्र येतील तेव्हाच हे शक्य होईल. या मिशनसाठी वाहन क्षेत्र, इंधन कंपनी, रसायनांची कंपनी आणि प्रगत साहित्य कंपन्यांना एकत्र यावे लागेल.

हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी भारत सध्या दोन प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करतो. प्रथम, पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करून हायड्रोजन वेगळा केला जातो. यामध्ये पाणी हे मुख्य स्त्रोत आहे. दुसरे म्हणजे, नैसर्गिक वायू तोडून हायड्रोजन आणि कार्बन वेगळे करणे. ही दोन्ही तंत्रज्ञान बाजारपेठेत आहेत परंतु व्यवसायाच्या उद्देशाने ती अद्याप सुरू केलेली नाही. नॅशनल हायड्रोजन मिशनच्या माध्यमातून ते व्यवसायासाठी तसेच वापरासाठीही उपयुक्त ठरेल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हायड्रोजन ऊर्जेच्या क्षेत्रात सरकारी आणि खासगी क्षेत्र मिळून काम करावे लागेल. मुंबईचा थिंक टँक गेटवे हाऊसमध्ये स्पेस आणि ओशन स्टडीजचे फेलो चैतन्य गिरी यांच्या म्हणण्यानुसार,  राष्ट्रीय हायड्रोजन मिशनमध्ये देशातील कंपन्या उदा. टाटा, रिलायन्स, महिंद्रा अँड महिंद्रा तसेच इंडियन ऑइल सोबत काम करू शकतात. देशात आजही बहुतांश ऊर्जा उत्पादन कोळशाच्या वापरातून होते. हायड्रोजन ऊर्जा मिशनच्या माध्यमातून भारताची योजना ग्रीन एनर्जी स्रोताला प्रोत्साहन देणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी करणे आहे.  हायड्रोजन एक खूप स्वच्छ व परवडणारा ऊर्जास्रोत आहे. याच्या उपयोगानंतर पाणीच निघते. त्यामुळे हे प्रदूषणरहित असते. हाय फ्युएल इफिशियन्सीमुळे याचा उपयोग रॉकेटच्या इंधनाच्या रूपातही होतो.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले होते की, सरकार २०२१-२२ मध्ये हायड्रोजन मिशन सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ही योजना सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती,  ज्यात हरित उर्जा स्रोतापासून हायड्रोजन तयार करण्याची तयारी सुरू आहे. यंदाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ते सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. हायड्रोजन वायूचे उत्पादन बर्‍याच स्रोतांपासून केले जाते, परंतु सरकारने हरित स्रोतापासून ते तयार करण्याची घोषणा केली आहे. जीवाश्म इंधनांवरील अवलंबन आणि प्रदूषण कमी करणे हे हायड्रोजन गॅस निर्मितीचे मुख्य उद्दीष्ट आहे. भारत आपल्या इंधनाचा एक तृतीयांश भाग आयात करतो, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर खूप ताण पडतो. त्यामुळे मोठ्या उद्योगपतीनी या प्रकल्पासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments