Thursday, February 25, 2021
Home India News भारतात डबल धमाका ! २ कोरोना प्रतिबंधात्मक लसींना परवानगी

भारतात डबल धमाका ! २ कोरोना प्रतिबंधात्मक लसींना परवानगी

भारतात कोरोनावरील लसींच्या आपातकालीन वापरासाठी मान्यता मिळताच जागतिक स्तरावरून या निर्णयाचं स्वागत झालं. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे संचालक व्ही.जी.सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. इथं देशातही पंतप्रधानांसह अनेक नेतेमंडळींनीही या निर्णय़ाचं स्वागत केलं. कोरोनाशी लढण्यासाठी उचलण्यात आलेल्या या पावलाचं जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कौतुक झालं. कोरोनाची लस नेमकी कितपत सुरक्षित आहे, या प्रश्नाचं उत्तर देत त्यानी ही लस ऑक्सफर्डमधील काही निष्णांत शास्त्रज्ञांनी विकसित केल्याची बाब अधोरेखित केली. शिवाय लसीबाबचा सर्व तपशील हा अनेक टप्प्यातील पडताळणीनंतरच हाती आल्याचंही ते म्हणाले. शिवाय या लसीला युकेमध्येही मान्यता मिळाली असून, आपल्या परिनं सर्व निकषांवर लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात आल्याचा विश्वास त्यांनी दिला.

येत्या काही आठवड्यात भारतात कोरोना लसीकरणाची पहिली मोहीम सुरु होईल, असंही अदर पुनावाला यांनी सांगितलं. पुनावाला म्हणाले की, “सीरम इन्स्टिट्यूटने धोका पत्करुन लस बनवण्याचा निर्णय घेतला होता, आता तो योग्य असल्याचं वाटतं.” ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहेच असं सांगताना लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीचे अनेक प्रयत्न सुरु असतानाच आता लसींच्या आपातकालीन वापराला मिळालेली परवानगी हा देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.  

लसीच्या पहिल्या मात्रेनंतर अर्थात पहिल्या डोसनंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगताना ते म्हणाले, लसीची पहिली मात्रा किंवा पूर्ण डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर हा बंधनकारकच आहे. कारण, लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग नाकारता येत नाही. कारण, ही लस काही बुलेटप्रूफ नाही. त्यामुळं सावधगिरी म्हणून मास्कचा वापर हा झालाच पाहिजे. लस घेतल्यानंतर होणाऱ्या काही परिणामांबाबत सांगताना, हलकी डोकेदुखी किंवा किरकोळ ताप जाणवू शकतो. पण, अशा वेळी पॅरासिटामोलच्या गोळीनं परिस्थिती नियंत्रणात आणता येईल, त्यासाठी चिंता करण्याचे किंवा गोंधळून जाण्याचे काहीही कारण नाही असे त्यांनी सांगितले.

एकीकडे या लसीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच तिथं विरोधी पक्षांनी मात्र या लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उभं केल आहे. तिसऱ्या ट्प्प्यातील चाचण्यांच्या अहवालाशिवाय लसीला मान्यता देण्यात आल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबाबत सीरमचे सीईओ  अदर पुनावाला यांनी लसीच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली.  त्याचप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले, आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. आत्मानिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्याचं हे एक महत्वाचं पाऊल आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments