Monday, March 1, 2021
Home India News कोरोना लसीकारणात भारताचा जगात ५ वा क्रमांक

कोरोना लसीकारणात भारताचा जगात ५ वा क्रमांक

कोरोनाच्या पहिल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात होऊन आता ६० दिवस पूर्ण झाले आहेत. पहिली लस ही रशियात ५ डिसेंबर रोजी देण्यात आली होती. ६ जानेवारीला भारत लसीकरण सुरू करणारा ३१वा देश होता. रशियाच्या या स्पूटनिक व्ही लसीला अद्याप जागतिक मान्यता मिळाली नाही. जगातील अनेक देशांत रशियाच्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.

कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी आता जगभरात लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जगातील सुमारे १० कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ३ कोटी २८ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. भारताचा या बाबतीत जगात पाचवा क्रमांक लागतोय. अमेरिकेत लसीकरणाला १४  डिसेंबर पासून सुरु करण्यात आले होते. त्या देशात आतापर्यंत तीन कोटी २८ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये आतापर्यंत २ कोटी लोकांना लस देण्यात आली असल्याचं सांगण्यात येतंय. चीन नंतर ब्रिटनचा क्रमांक लागतोय. त्या देशात १ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. चौथ्या स्थानी इस्त्रायल आहे. तर भारताचा ५ वा क्रमांक लागतोय. भारतात आतापर्यंत ४१ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्यात लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट किंवा तिनपट करणार आहे. छत्तीसगडमध्ये सध्या २०० केंद्रे आहेत,  बुधवारपासून ७०० केंद्रे असतील. झारखंडमध्ये १६० केंद्रे आहेत, दोन आठवड्यांत ३०० केली जातील. बिहारमध्ये ६८९ केंद्रे आहेत, ती १ हजार केली जातील. दुसरीकडे, १२ राज्यांत याच आठवड्यात फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण होईल.

लोकसंख्येच्या प्रमाणात आकडेवारी काढली तर इस्त्रायलमध्ये सर्वाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. इस्त्रायलमध्ये आता पर्यंत ३७% लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये अनेक लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. ब्लूमबर्गच्या व्हॅक्सिन ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत करण्यात आलेले कोरोना लसीकरण हे जगातील एक तृतीयांश इतकं आहे. धक्कादायक म्हणजे जगातील सर्वाधिक गरीब असे २९ देश आहेत जिथे अद्याप कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकली नाही. जगभरात आतापर्यंत दहा कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो आहे.

गेल्या दोन महिन्यांत ६० देशांनी भारताकडे लसीची मागणी केली आहे. त्यापैकी १७ देशांना ३१ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत ६४ लाख डोस पाठवण्यात आले होते. बांगलादेशला सर्वाधिक २० लाख, म्यानमारला १५ लाख आणि नेपाळला १० लाख डोस पाठवण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments