Thursday, February 25, 2021
Home India News देश अजूनही कोरोनाच्या सावटाखाली..

देश अजूनही कोरोनाच्या सावटाखाली..

गेल्या २४ तासांत १९ हजार ५८७ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १६ हजार ८५९ झाली आहे. देशात बरे होण्याचा दर वाढून ९६.१६ टक्के झाला  असून, कोरोनाचा मृत्युदर १.४५ टक्के आहे. तसेच देशभरात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २ लाख २८ हजार ०८३ आहे. ६ जानेवारी २०२१ पर्यंत संपूर्ण देशभरातून १७ कोटी ८४ लाख ९९५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. यापूर्वी ५८ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचे समोर आले होते. बुधवारी यात नव्या १३ रुग्णांची भर पडून एकूण आकडा ७१ झाला आहे. या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेले आहेत.

देशभरात कोरोनाचे सावट अजून दूर होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २० हजार ३४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. बुधवारी १८ हजार ८८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज सकाळी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची लागण झालेल्या २० हजार ३४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ०३ लाख ९५ हजार २७८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर आता देशभरात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. दररोज सुमारे १३ लाख जणांना लस देण्यात येणार असून, उद्या पुन्हा एकदा देशात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात येणार आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

एका आढाव्यानुसार, देशात स्थानिक संतुलन राखण्यासाठी दररोज १५ लाख ६४५ जणांना लस देणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिदिन लसीकरण केले, तरच देशातील कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होईल. यामुळे प्रतिदिन किमान १३ लाख जणांचे लसीकरण करण्याची सरकारी योजना आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments