Sunday, February 28, 2021
Home India News ४ डिसेंबर भारतीय नौदल दिवस

४ डिसेंबर भारतीय नौदल दिवस

या वर्षीची भारतीय नौदल दिना निमित्त "Indian Navy Combat Ready, Credible & Cohesive" ही थीम आहे.

प्रत्येक वर्षी ४ डिसेंबर हा भारतीय नौदलाचा हा दिवस साजरा करताना एक विशेष थीम तयार करण्यात येते. या वर्षीची भारतीय नौदल दिना निमित्त “Indian Navy Combat Ready, Credible & Cohesive” ही थीम आहे. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदलाची सुरुवात ईस्ट इंडियाच्या काळात झाल्याचं वाचनात येते. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाची एक टीम तयार केली. नंतर याचं नामकरण रॉयल इंडियन नेव्ही असं करण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० साली रॉयल इंडियन नेव्ही हे नाव बदलून भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्ही असे करण्यात आले. भारतीय नौदल दिवसा निमित्त दरवर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याची तयारी विशाखापट्टणमच्या इंडियन नेव्ही बेसवर करण्यात येते. सुरुवातीला युध्द स्मारकाला पुष्प अर्पण केले जाते आणि नंतर नौदलाच्या पाणबुडी, जहाजं आणि विमानांच्या ताकदीचे आणि वेगवेगळ्या थरारक कसरतींच आयोजन करण्यात येते.

१९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचे नाव होतं ऑपरेशन त्रिशूल. ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या नौदल मुख्यालय असलेल्या कराची बेसला लक्ष करण्यात आलं. भारतीय नौदलानं ४ डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक लष्करी विमानांचं नुकसान झाले. त्यामुळे पाकिस्तानची भारतावर बॉम्ब वर्षाव करण्याची क्षमता कमी झाली. त्यात भारताच्या नौदलाच्या वतीनं पहिल्यांदाच अॅन्टी शीप मिसाईलचा वापर करण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या या प्रखर हल्ल्यात पाकिस्तानच्या नौदलाचं आणि कराची बंदराचं अतोनात नुकसान झालं. त्यांची एक बाजू कमकुवत होऊन त्याचा परिणाम युध्दाच्या रणनीतीवर झाला. भारतीय नौदलाच्या हल्ल्याने युध्दाचं चित्रच पालटलं आणि पुढील केवळ १३ दिवसात भारतानं पाकिस्तानविरुध्दचं १९७१ चे युध्द जिंकलं. परिणामी पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांग्लादेश स्वातंत्र्य झाला.

भारतीय नौदलाच्या या अफाट कामगिरीमुळं पाकिस्तानच्या नौदलाला पळता भुई थोडी केली. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना म्हणजेच नेव्ही डे साजरा केला जातो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments