Wednesday, April 21, 2021
HomeIndia Newsआंतरराष्ट्रीय महिला दिनी हरसर्कल वेबसाईट लॉन्च

आंतरराष्ट्रीय महिला दिनी हरसर्कल वेबसाईट लॉन्च

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी महिलांसाठी तयार करण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म ‘हरसर्कल’ ला लॉन्च केलं आहे. वैश्विक स्तरावर महिलांचं सशक्तीकरण आणि उन्नतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हरसर्कल प्लॅटफॉर्म हा नेटवर्किंग, सहभाग आणि परस्पर समर्थनासाठी महिलांसाठी एक सुरक्षित माध्यम नक्कीच ठरेल. जगभरातील महिलांसाठी डिजिटल ग्रुप म्हणून ‘हरसर्कल’ तयार करण्यात आलं आहे. भारतीय महिलांपासूनच याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, जगभरातील महिलांच्या सहभागामुळेच त्यांचा रस्ता मोकळा होणार आहे. प्रत्येक वयोगटातील आणि आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्या इच्छा, महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांना पूर्णत्वाला नेण्यास मदत करेल.

‘हरसर्कल’च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना रिलायन्सच्या प्रमुख नीता अंबानी म्हणाल्या की, जेंव्हा एखादी महिला दुसर्या महिलांची काळजी घेतात, तेंव्हाच अनेक अविश्वसनीय गोष्टी घडतात. मी 11 मुलींच्या कुटुंबात वाढले. जिथे मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी मुलगी ईशाकडून कोणत्याही अटीशिवाय प्रेम आणि विश्वास ठेवायला शिकले. मी सहानुभूती आणि धैर्य माझी सून श्लोकाकडून शिकले. रिलायन्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम करणाऱ्या महिला असो वा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला नेत्या, आमच्या अनुभवांनी मला शिकवलं आहे की, आपला संघर्ष आणि विजय एकमेकांशी गुंफलेले आहेत.

Women's Day

नीता अंबानीनी सांगितले की, HerCircle.in या वेबसाईटमार्फत आम्ही करोडो महिलांसाठी एक मोठी संधी होऊ शकते. यामध्ये प्रत्येक महिलेचं स्वागत केलं जाईल. चोवीस तास डिजिटल क्रांती, नेटवर्किंग आणि सर्वांच्या मदतीने हरसर्कल महिलांचे विचार आणि त्यांच्या मतांचं नक्कीच स्वागत करेल. समानता आणि समता ही या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्य असतील. या प्लॅटफॉर्मवर महिलांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होती. त्याचसोबत यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी काही महत्वाच्या टिप्सही महिलांना शिकायला मिळणार आहेत. हरसर्कलचा सोशल नेटवर्किंग भाग केवळ महिलांसाठीच असेल. यामध्ये असणारे व्हिडीओ आणि आर्टिकलचं सेक्शन हे सर्वांसाठी खुल असेल. या शिवाय आर्थिक व्यवस्थापन कसे करावे ! एक विशेष चॅटरूम आरोग्य विषयक समस्यांशी निगडीत प्रश्नांसाठी तयार करण्यात आली आहे. हर गुड हॅबिट अॅप ट्रॅकरही गरोदरपणा, पालकत्व आणि फिटनेससंबंधी विषयांसाठी यामध्ये देण्यात आले आहे.  ही एक वेबसाईट असल्याने, डेस्कटॉप आणि मोबाईलवर हरसर्कल वापरता येणार आहे. त्यासोबत गूगल प्लेस्टोअर आणि माय जियो अॅप स्टोअरवर ही हरसर्कल वेबसाईट मोफत उपलब्ध होणार आहे. युजर्स यामध्ये रजिस्ट्रेशन फ्री आहे. सध्या ही वेबसाईट इंग्रजी भाषेत उपलब्ध असून, ही वेबसाईट इतर भारतीय भाषां मध्येही येत्या काळात उपलब्ध करण्यात येणार आहे.  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मार्फत महिला एकमेकींशी संवाद साधू शकतील. इथे व्हिडीओ पाहू शकतील. याव्यतिरिक्त मनोरंजन, सर्जनशीलता, आर्थिक, काही कामं, व्यक्तित्व विकास, स्वत:चं अभिव्यक्ती स्वातंत्र्य,  सौंदर्य, फॅशन, सामुदायिक सेवेशी निगडीत आर्टिकल्सचाही आस्वाद घेऊ शकतील. महिलांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभागावर आधारित लेखसुद्धा वाचायला मिळतील. तसेच रिलायन्सच्या विशेषतज्ज्ञांच्या पॅनल मार्फत या प्लॅटफॉर्मवर महिलांना आरोग्य, आर्थिक, परोपकार, कल्याण, शिक्षण, उद्योजकता आणि नेतृत्त्वावर मोफत सल्लाही देण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments