Friday, February 26, 2021
Home India News इस्रोचे यशस्वी उड्डाण

इस्रोचे यशस्वी उड्डाण

इस्त्रोने गुरुवारी दुपारी ३ वाजून ४१ मिनीटांनी भारताचा नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या वर्षातले इस्त्रोचं हे दुसरे प्रक्षेपण आहे. या आधी नोव्हेंबरच्या सुरुवातीला इस्त्रोने EOS-01 अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. भारताचा ४२ वा संप्रेषण उपग्रह गुरुवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात सोडले. हा उपग्रह अत्याधुनिक दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोची श्रीहरिकोटा इथली ही ७७ वी प्रक्षेपण मोहीम होती. CMS-01 हा सुमारे एक हजार ४१० किलो वजनाचा उपग्रह २०११ ला पाठवलेल्या GSAT-१२ या उपग्रहाची जागा घेणार आहे. CMS-01 या उपग्रहाचा कार्यकाल सात वर्षांचा असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटीसाठी मदत करणार आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतिश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आले आहे. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून २५ तासांचे काउंटडाउन सुरु होते. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे आजचे ५२ वे अभियान आहे.

ISRO launches new satelite

श्रीहरीकोटा येथे असलेल्या द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी५० रॉकेटने अवकाशात उड्डाण केले. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्राला एसएचएआर देखील म्हटले जाते. सीएमएस-०१,  इस्रोचा ४१ वा संप्रेषण उपग्रह आहे. हा उपग्रह भारताची मुख्य भूमी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या फ्रीक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या विस्तारीत सी बँडमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. CMS-01 हा भारताचा ४२ वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून भारतीय मुख्य भूमीसोबतच अंदमान- निकोबार आणि लक्षद्विप ही बेटंही त्यामध्ये येणार आहेत. हा उपग्रह सात वर्षापर्यंत काम करेल असे सांगण्यात आले आहे. PSLV-C50 या ४४ मीटर उंचीच्या सॅटेलाईटमध्ये चार स्टेजच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे प्रक्षेपण PSLV या प्रकारातले २२ वे यशस्वी प्रक्षेपण आहे.

इस्त्रोने आज नवा इतिहास रचला आहे. इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटपासून ते टीव्हीच्या सिग्नल्सपर्यंतच्या सर्व गोष्टींच्या दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी ही एक चांगली बाब असणार आहे. हा उपग्रह आकाशात झेपावण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. मात्र, खराब हवामानामुळे शास्त्रज्ञ त्याच्या उड्डाणासाठी परवानगी देत नव्हते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments