Sunday, February 28, 2021
Home India News कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोना भारताने घेतले फैलावर

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोना भारताने घेतले फैलावर

'कॅनडानं नेहमीच शांततामय मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिलाय. आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनाकडेही याबाबतची चिंता व्यक्त केली' असं ट्विट ट्रुडो यांनी केलं होते.

मागील एक आठवड्यापासून दिल्लीमध्ये पंजाब आणि हरयाणातून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत आहेत. सर्व आंदोलक शेतकरी सरकारने आपल्या कृषी विधेयकाचा विरोध करत आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे मागणी करत आहेत. आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यासाठी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेटस, नाकाबंदी केली. तसंच रस्त्यात अडथळे ठेवण्यात आले होते. पण कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत प्रवेश करणारच अशी भूमिका शेतकऱ्यानी घेतली. यावरून काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी पोलिसांना अश्रुधूराचा मारा करावा लागला त्याचप्रमाणे आंदोलकांवर पाण्याचा माराही करण्यात आला. पण मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. पोलिसांनी शुक्रवारी निदर्शकांना दिल्लीत येण्याची आणि बुराडी परिसरात शांततापूर्ण निदर्शनं करण्याची परवानगी दिली होती. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते इश सिंघल यांनी सांगितलं, “शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत बातचीत केल्यानंतर आम्ही त्यांना बुराडीच्या निरंकारी मैदानात शांततापूर्ण पद्धतीने निदर्शनं करण्याची परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांनी शांतता राखावी, असं आम्ही त्यांना आवाहन करतो.

आठवडाभर चाललेल्या आंदोलनाचे पडसाद जगभरामध्ये दिसून येत होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्लाही देण्यात आलाय. ‘कॅनडानं नेहमीच शांततामय मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिलाय. आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनाकडेही याबाबतची चिंता व्यक्त केली’ असं ट्विट ट्रुडो यांनी केलं होते.

परंतु त्यांच्या या ट्वीट बद्दल सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते  अनुराग श्रीवास्तव यांनी ट्रुडो यांच्या ट्वीटवर मीडियानं केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. ‘आम्ही भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची टिप्पणी पाहिली परंतु, ही प्रतिक्रिया चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. या पद्धतीच्या टिप्पण्या अनावश्यक आणि निरुपयोगी आहेत. विशेष करून जेव्हा ही बाब एका लोकशाही देशातील अंतर्गत मुद्द्यासंबंधीत असेल. अशा गोष्टी राजकीय हेतूनं चुकीच्या पद्धतीनं समोर आणू नये, हीच योग्य गोष्ट ठरेल’ असं प्रत्यूत्तर श्रीवास्तव यांनी दिलं. त्याचप्रमाणे शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करत, ट्रुडो यांना भारताच्या अंतर्गत मुद्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हटले आहे. ‘प्रिय जस्टिन ट्रुडो, तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीमुळे प्रभावित आहे. परंतु भारताच्या अंतर्गत मुद्दे इतर कोणत्याही दुसऱ्या देशासाठी राजकीय चारा बनू शकत नाहीत. कृपया इतर देशांप्रती शिष्टाचाराच्या आमच्या भावनेचा सन्मान करा’ असं चतुर्वेदी यांनी ट्रुडो यांना टॅग करत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments