Monday, March 1, 2021
Home India News किसान एकता पेज फेसबुकवर पुन्हा Active

किसान एकता पेज फेसबुकवर पुन्हा Active

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक सेलिब्रिटींनीही शेतकरी आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु याच दरम्यान  या आंदोलक शेतकऱ्यांकडून सुरू करण्यात आलेल्या किसान एकता फेसबुक पेजला फेसुबक कडून सस्पेंड करण्यात आले होते. मात्र, सोशल मीडियावरील विरोधानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या २५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन पुकारले असून आज आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ शेती विधेयकास विरोध दर्शवत शेतकरी एकत्र आले आहेत. पंजाबातून दिल्लीला येणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीजना थांबवण्यात येत असल्याचं शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना न अडवण्याचं आवाहन त्यांनी सरकारलं केले आहे. ते म्हणाले, “जर सरकारने १९ डिसेंबरपर्यंत आमचं म्हणण ऐकले नाही, तर गुरू तेगबहाद्दुरांच्या शहीद दिनापासून आम्ही उपोषण सुरू करू.” सरकारसोबत चर्चेसाठी आपण तयार आहोत पण सरकारने आधी तीनही कृषीविधेयकं मागे घ्यावीत असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. तर आपलं सरकार शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी बांधिल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

फेसबुकने कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेसनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज सस्पेंड केले होते. त्यामुळे, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक आणि नेटीझन्स चांगलेच चिडले आहेत. फेसबुक आणि ट्विटररच्या माध्यमातून नेटीझन्स आपला रोष व्यक्त करत आहेत. फेसबुकवर पोस्ट लिहून तर ट्विटरवर झुकेरबर्गच्या विरोधात ट्रेंड सुरू करुन फेसबुकचा निषेध करण्यात येत आहे. रविवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर फेसबुक आणि झुकेरबर्ग विरुद्ध पोस्ट पाहायला मिळाल्या. सोमवार सकाळपासूनच ट्विटरवर #zukerbergshameonyou आणि #FacebookShameonyou हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. मार्क झुकरबर्ग भाजपाच्या बाजुने काम करत असल्याचा आरोपही नेटीझन्सकडून होत आहे. तर, झुकेरबर्ग हा भाजपाचा चमचा असल्याचा आरोपही अनेकांनी केलाय. मात्र, सोशल मीडियातील विरोधानंतर फेसबुकने पुन्हा किसान एकता मोर्चा हे पेज सुरू केले आहे. परंतु किसान एकता मोर्चाचे पेज कंपनीच्या नियमांचं पालन करत नाही, असं फेसबुकनं म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनाची लढाई सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेलं किसान एकता मोर्चा  हे पेज फेसबुकनं सस्पेंड केले आहे. किसान एकता मोर्चा पेजवरुन आंदोलनाशी संबंधित अधिकृत माहिती देण्यात येत आहे. शेतकरी आंदोलनाची दिशा आणि रणनिती नेटीझन्स आणि जगभरातील समर्थकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या पेजद्वारे सध्या सुरू आहे. त्यामुळेच, हे फेसबुक पेज बंद झाल्यानंतर झुकरबर्गला युजर्सच्या संतापाला सामोरे जावे लागले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments