Monday, March 1, 2021
Home India News अनेक सेलिब्रेटींची शेतकरी आंदोलनासंदर्भात उडी

अनेक सेलिब्रेटींची शेतकरी आंदोलनासंदर्भात उडी

भारतात ७० दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातील अनेक बड्या व्यक्तींचे समर्थन मिळाले आहे. हॉलिवूड अभिनेत्री अमांडा, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाची मीना हॅरिस, नॉर्वेची १८ वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉप गायिका रिहाना, मियाँ खलिफा यांसह परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. या सर्व सेलिब्रिटींच्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रक्रिया दिली आहे.

हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर, कंगना राणावत, अक्षय कुमार, अजय देवगण, एकता कपूर, विराट कोहली, सचिन तेंडुलकरसह, गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेचं स्वागत करत ट्वीट केलं आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया देत, सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारत महान देश आहे आणि आपण सगळे भारतीय यामुळं गौरवान्वित आहोत. त्यांनी म्हटलंय की, एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो अथवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. आपल्या लोकांचं हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीनं तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘इंडिया टूगेदर’ आणि ‘इंडिया अगेनस्ट प्रोपगेंडा’ असे हॅशटॅगही दिले आहेत.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनीही याला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले की, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहीत आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.

अभिनेता सुनील शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की – आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यापक नजरेने पाहिले पाहिजे. कारण अर्धसत्य धोकादायक असते.

करण जोहरने लिहिले आहे की आपण कठीण काळात जगत आहोत आणि प्रत्येक वळणावर धीर धरला पाहिजे ही काळाची गरज आहे. एकत्र येऊन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. शेतकरी हा भारताचा कणा असून यात कुणालाही फूट पाडू देऊ नका.

शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा. अभिनेता अक्षय कुमारने आज ट्वीट केले आहे.

भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही प्रचाराचा भाग होऊ नका. कोणताही मतभेद न करता एकत्र उभे राहणे महत्वाचे आहे.  बॉलिवूड सिंघम अभिनेता अजय देवगण यांनी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली विरोध करणार्‍यांना इशारा देत आपण कोणत्याही प्रचाराचा भाग घेऊ नये, असा सल्लाचं दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments