Monday, March 1, 2021
Home India News शहीद मेजर मोहित शर्मा

शहीद मेजर मोहित शर्मा

देशाप्रती कमालीचं प्रेम असणाऱ्या या व्यक्तीनं या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या योगदानाविषयी वाचताना नक्कीच अभिमानास्पद वाटते आणि कंठ या समर्पणानं दाटून येतो. नकळतच डोळ्यातून अश्रूही ओघळू लागतात. मेजर मोहित शर्मा हे पॅरा स्पेशल फोर्सच्या तुकडीत सेवेत होते. त्यांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांना असा विश्वास दिला होता, की आपणही या दहशतवादी संघटनेचा भाग असून आपलही लक्ष भारतीय सैन्याचा खातमा करण्यावरच आहे. हिज्बुलमध्ये भारतीय सैन्याकडून गुप्तहेर म्हणून गेलेल्या मेजर शर्मा यांनी आपल्या भावाला २००१ मध्ये भारतीय सैन्याकडून ठार मारण्यात आल्याचं खोट सांगितले होतं. तिथं इफ्तिखार भट्ट म्हणून ते ओळखले जात होते. दहशतवाद्यांचाच वेश धारण करुन त्यांच्यासोबत राहण्याचं धाडस करणाऱ्या मेजर शर्मा हे २१ मार्च २००९ मध्ये ब्रावो अस़ॉल्ट टीमचं नेतृत्त्व करत असताना कुपवाडा येथे झालेल्या एका चकमकीत शहीद झाले. मेजर नेतृत्त्व करत असणाऱ्या ऑपरेशनला रक्षक असं नाव देण्यात आलं होतं. देशासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या मेजर शर्मा यांनी दोन साथीदारांचे प्राण वाचवले पण,  त्यांना मात्र वीरमरण आले होते. मरणोत्तर अशोक चक्र या बहुमानानं मेजर शर्मा यांचा भारत सरकारनं सन्मानही केला.

Martyr Major Mohit Sharma in pakistan

मेजर मोहित शर्मा बनलेत इफ्तिखार भट्ट !

मेजर मोहित शर्मा यांनी हिज्बुलच्या दहशतवाद्यां समवेत संपर्क वाढवला होता. अबू तोरारा आणि अबू सबजार अशी त्या दहशतवाद्यांची नावं असल्याचं सांगण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर मेजर शर्मा यांनी त्यांची ओळख इफ्तिखार भट्ट म्हणून सांगितली. त्यांनी दहशतवाद्यांचा विश्वास असा काही जिंकला होता, की भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा त्यांचा खोटा मनसुबा दहशतवाद्यांना खरा वाटला. आर्मी चेकपॉईंटवर हल्ला करण्याचा आपला बेत असल्याचं सांगत त्यांनी यासाठीचा पूर्ण बेतही आखला होता. ज्यानंतर त्यांची मदत करण्याचं दहशतवाद्यांनी ठरवलं. दहशतवाद्यांनी त्यांना आपण अंडरग्राऊंड होणार असल्याचं सांगितलं जेणेकरुन हत्यारं आणि हल्ल्यासाठीचं सामान एकवटता येईल. जोपर्यंत आपण भारतीय सैन्यावर हल्ला करत नाही तोवर मूळ गावीही परतणार नसल्याचं इफ्तिखार भट्टचं रुप घेतलेल्या मेजर शर्मा यांनी दहशतवाद्यांना पटवून दिलं.

Major Mohit Sharma in indian army force

देशासाठी प्राणही नगण्य असल्याची वृत्ती उराशी बाळगण्यासाठी धाडस आणि कमालीची एकनिष्ठता हवीच. अशीच वृत्ती उराशी बाळगून एका व्यक्तीनं देशसेवेचा ध्यास घेतला होता. देशाप्रती प्रेम असणं आणि या प्रेमापोटी देशसेवेत स्वत:ला झोकून देणं,  प्राण पणाला लावणं या सर्व गोष्टी बोलण्यास जितक्या सोप्या आहेत तितक्याच मुळात प्रत्यक्षात उतरविणे कठीण. भारताच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या सैन्यदलाच्या सेवेत असताना मेजर शर्मा यांनी अशी काही कामगिरी केली जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी जणू देशप्रेमाचा एक आदर्शचं प्रस्थापित करुन गेली.

त्यांच्या याच कामगिरीला सलाम करण्यासाठी म्हणून आता एक चित्रपटही साकारण्यात येणार आहे. २०२२ मध्ये स्वातंत्र्य दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. शिव अरुर आणि राहुल सिंह यांच्या India’s Most Fearless 2: More Military Stories Of Unimaginable Courage And Sacrifice या पुस्तकातील पहिल्याच प्रकरणावर चित्रपटाचं कथानक आधारलेलं असेल असं सांगण्यात येत आहे. अप्लॉज एंटरटेन्मेंट आणि दृश्यम फिल्म्स अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments