Monday, March 1, 2021
Home India News मुकेश अंबानी यांनी झुकरबर्गकडे केली आपली इच्छा व्यक्त

मुकेश अंबानी यांनी झुकरबर्गकडे केली आपली इच्छा व्यक्त

सध्या आपण जगात कोणत्याही ठिकाणी क्रिकेटचा सामना सुरु असो, त्याचा टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या आनंद घेऊ शकतो. पण व्हर्च्युअल आणि ऑगमेन्टेड रियालिटी ही कल्पना सत्यात आली तर आपण घरबसल्याही त्या क्रिकेटच्या मैदानात व्हर्च्युअली उपस्थित राहू शकतो आणि त्या सामन्याचा प्रत्यक्ष आनंद घेऊ शकतो. ही कल्पना डिजिटल क्षेत्रात एक क्रांतीच असेल. इंटरनेटची सुरुवात झाली तेंव्हा लोक एकमेकांना मेसेज करायचे. त्यानंतर त्याचा विकास होत गेला आणि लोक फोटो पाठवू लागले. आता ४जी आणि ५जी चा वापर करुन लोक आपले व्हिडिओ पाठवतात. भारतात २०२१ सालच्या उत्तरार्धात ५जी सेवा सुरु करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.

रिलायन्स इन्डस्ट्रिजचे मालक आणि क्रिकेट प्रेमी मुकेश अंबानी आपल्या व्यस्त कारभारातून क्रिकेटचा आस्वाद घेऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे आज जगभरच्या सर्व सुविधा आहेत पण ते आपल्या आवडत्या क्रिकेट सामन्याची लाईव्ह मॅच पाहू शकत नाहीत. मला मुंबईत बसून ऑस्ट्रेलियाच्या स्टेडिअमवर व्हर्च्युअल उपस्थित राहून लाईव्ह क्रिकेट सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे अशी इच्छा मुकेश अंबानी यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याकडे व्यक्त केली. Facebook Fuel for India २०२० या कार्यक्रमाचे फेसबुकच्या वतीनं आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी मंगळवारी रिलायन्स इन्डस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यात चर्चा झाली. यादरम्यान फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यानी व्हर्च्युअल आणि ऑगमेन्टेड रियालिटीच्या ताकदीची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी झुकरबर्ग यांच्याकडे आपली एक इच्छा व्यक्त केली.

मुकेश अंबानींनी व्यक्त केलेल्या इच्छेला उत्तर देताना मार्क झुकगबर्ग म्हणाले की, “कदाचित आजपासून पाच किंवा दहा वर्षात माझे होलोग्राम व्हर्जन तुमच्या शेजारी बसले असेल. त्यावेळी आपण अशा प्रकारची चर्चा स्क्रीनवर न करता अधिक वास्तववादी पध्दतीने एकमेकांच्या शेजारी बसून करु. ही अविश्वसनिय कल्पना सत्यात येईल.” फेसबुकच्या युजर्सच्या मागणीवरुन फेसबुकने या आधीच भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामने फेसबुकवर दाखवले आहेत. त्याबद्दल मार्क झुकरबर्ग यांनी माहिती दिली. त्यानंतर मुकेश अंबानी म्हणाले की, “फेसबुकने अशा प्रकारची सुविधा या आधीही सुरु केली आहे. याच्याही पुढे जाऊन भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचा व्हर्च्युएल आनंद घेता आला पाहिजे. मला मुंबईत बसून ऑस्ट्रेलियातील सामना तिथल्या स्टेडिअमवर व्हर्च्युअल उपस्थित राहून पहायचं आहे. आणि मला आशा आहे की फेसबुकच्या नेतृत्वाखाली एक दिवस ही गोष्ट नक्कीच शक्य होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments