Thursday, February 25, 2021
Home Automobiles & Bikes वाहन परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही

वाहन परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही

लायसन्स या विषयाकडे आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालत ही प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे. यामध्ये आता नागरिकांसाठी आणखी सोयीच्या योजना आखण्याचा सरकार विचार करत आहे. सरकारने यामध्ये आणखी एक मोठा बदल करण्याचे ठरविले असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा देण, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. म्हणजेच काय तर जर तुम्हाला ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी शिकत असाल तर परवान्यासाठी तुम्हाला टेस्ट देण्याची काही गरज नाही. मंत्रालयामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग या योजनेवर विशेष काम सुरू असून मंत्रालयाने त्यासाठी अधिसूचनाही जारी केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

No driving test is required for driving license

अलीकडेच रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये वाहन मालक कॉन्टॅक्ट लेस सेवा घेऊ शकतात. याशिवाय परिवहन विभागाचे काम तासनतास रांगेत उभे राहून करण्याऐवजी आधार वापरून सोप्या पद्धतीने करण्यास ते सक्षम असतील. या मसुद्यामध्ये परवाना मिळवणे, डीएलचे नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवान्यासह वाहन कागदपत्रांचे हस्तांतरण करणे यासह १६ अन्य सेवांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी आधारचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल. त्यानुसार या पोर्टलमार्फत ज्यांना कॉन्टॅक्ट लेस सेवा मिळवायच्या आहेत, त्यांना आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल. या नियमांसह, आधार प्रमाणीकरण घरून देखील ऑनलाईन देखील केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला आधार प्रमाणीकरणासाठी कुठे जाण्याची इच्छा नसल्यास, अशा प्रकारच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी त्यांना वैयक्तिकपणे कार्यालयात जावेच लागेल.

आधार प्रमाणीकरणामुळे बनावट लायसन्स वापरणाऱ्यांवर बंदी येईल आणि कोणतीही व्यक्ती डूप्लीकेट किंवा एकापेक्षा जास्त वाहनचालक परवाना वापरण्यास सक्षम राहणार नाही. याचे स्पष्टीकरण देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोक ऑनलाईन सेवांसाठी अधिक पर्याय निवडत आहेत आणि आम्ही ते जास्तीत जास्त वापरले जाईल, अशी अपेक्षा करतो. याशिवाय ड्राइविंग परवानाधारक आणि वाहन मालकांना सोळा प्रकारच्या ऑनलाइन आणि कॉन्टैक्टलेस सेवा मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची आवश्यकता असेल. यामुळे परिवहन विभागाच्या कार्यालयांच्या खेटा घालण्यापासून सुटका होईल. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लर्नर्स लाइसेंस, ऑनलाईन वाहन चालविण्याचा परवाना नूतनीकरण, पत्ता बदलणे, नोंदणीचे प्रमाणपत्र, आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना, ट्रांसफर नोटिस आणि ओनरशिप ट्रांसफर सारख्या सोळा सेवासाठी आधार आवश्यक असेल आणि सरकारने या योजनेवर काम सुरू केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments