Thursday, February 25, 2021
Home Devotion देव दिवाळीला नरेंद्र मोदींची वाराणसीत उपस्थिती

देव दिवाळीला नरेंद्र मोदींची वाराणसीत उपस्थिती

धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असं म्हणतात. तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ म्हणूनही संबोधलं जातं. हा सण वाराणसीत धडक्याने साजरा केला जातो. हा सण काशीच्या ऐतिहासिक गंगेच्या घाटांवर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात. काशीमध्ये दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. या दिवसाचं विशेष महत्त्व पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे, कि या दिवशी सगळे देव पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आणि तलावात स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदा तर देव दिवाळी दोन दिवस आली आहे. त्यामुळे देव दिवाळी २९  नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. तर ३० नोव्हेंबर रोजी लोक गंगा, यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करतील. असं केल्याने मोक्ष प्राप्ती होतं, असे पूर्वापार मानले जाते.

देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासोबतच भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये उपस्थित राहणार आहेत. यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने ११ लाख दिवे वाराणसीत लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वाराणसीच्या चेतसिंह तटावर भव्य लेझर शोचा सरावही घेण्यात आला. रावण रचित शिव तांडव स्त्रोत्रम् शिव स्तुति, ॐ नमः शिवाय चे उद्घोषांवर भव्य लेझर शोचा सराव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विशेषतः हा लेझर शो तयार करण्यात आला आहे.

narendra modi visit to varanasi

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची नियोजित रूपरेषा कशा प्रकारे आहे ते थोडक्यात पाहूया. अयोध्येत दिवाळीनंतर आता उत्तर प्रदेश सरकार वाराणसीत देव दिवाळीचं भव्य आयोजन करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी २ वाजून १० मिनिटांनी वाराणसीतील बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरक्षेची व्यवस्था केली आहे. वारणसीच्या डीएम कौशल राज शर्मा यानी सांगितलं की, पंतप्रधानांच्या आगमना आधी सर्व तयारी करण्यासाठी लोकनिर्माण, पर्यटन, नगर निगमसह इतर विभागांसाठीही आदेश जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी संध्याकाळी ५.४५ वाजता क्रूजने रविदास तटावर जाण्यासाठी रवाना होतील आणि चेतसिंह तटावर १० मिनिटांचा लेझर शो पाहतील. रविदास तटावर पोहोचून तेथून गाडीने सारनाथसाठी रवाना होतील. तिथे लाइट अँड साउंड शो पाहतील आणि ८.१५ वाजता बाबतपूर विमानतळावरून दिल्लीला परततील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments