Sunday, March 7, 2021
Home India News प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूरचा शेतकरी आंदोलनाला ऑनलाईन पाठींबा

प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूरचा शेतकरी आंदोलनाला ऑनलाईन पाठींबा

आपले शेतकरी भारताचे फूड सोल्जर आहेत. एक सशक्त लोकशाही असलेल्या देशात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघायला हवा, असं प्रियांकानं म्हटले आहे.

गेल्या ११ दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली मध्ये आंदोलन करीत आहे. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गेले ११ दिवस आंदोलन छेडले आहे. मोदी सरकारने शेतकरी विरोधातील कायदे तात्काळ मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहेत. दिल्लीला येणारे अनेक रस्ते बंद आहेत. दिल्ली-हरियाणा सीमेवर सिंधु, पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने जाहीर समर्थन दिले आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे,  अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली. अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

शनिवारी ५ डिसेंबर दिल्लीतील विज्ञान भवनात आंदोलनकर्ते, शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा झाली. “नवीन कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किमतीवर काहीच परिणाम होणार नाही. हा राज्यांचा प्रश्न आहे. याचा राज्यातील बाजार समितीवर कोणताच परिणाम होणार नाही,” असे आश्वासन पाच तास चाललेल्या चर्चेत शेतकर्यांना सरकारने दिले. नवीन कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किमतीवर काहीच परिणाम होणार नाही. हा राज्यांचा प्रश्न आहे. याचा राज्यातील बाजार समितीवर कोणताच परिणाम होणार नाही,” असे आश्वासन पाच तास चाललेल्या चर्चेत शेतकर्यांना सरकारने दिले. दिल्लीत सुरू झालेली थंडी आणि कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, आंदोलन स्थगित करा, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना घरी पाठवण्याची विनंती सरकारने केली आहे.

या आंदोलनाला राजकीय पक्ष, खेळाडू, साहित्यिक यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. यात आता दोन अभिनेत्रींचा समावेश झाला आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रियांका चोप्रा आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढं आल्या आहेत. सोनम आणि प्रियांकानं सोशल मीडियावरुन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. प्रियंका आणि सोनमशिवाय अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात रितेश देशमुख, हंसल मेहता, गौहर खान, चित्रांगदा सिंह यांचा समावेश आहे. अभिनेता दिलजीत दोसांझने तर या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.

 

सोनमने डॅनियल वेबस्टर यांचं एक वाक्य शेअर केलंय. त्यात शेतकरी मानवी सभ्यतेचे संस्थापक असल्याचं लिहिलं आहे. सोनमचा पती आनंद आहूजानं देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आहे. शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करताना सोनमनं आंदोलनाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं शेतकऱ्यांना भारतीय सैनिक म्हटलं आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात असं तिनं म्हटलं आहे. प्रियांकानं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपले शेतकरी भारताचे फूड सोल्जर आहेत. एक सशक्त लोकशाही असलेल्या देशात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघायला हवा, असं प्रियांकानं म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments