Sunday, March 7, 2021
Home India News कोरोना काळातील रिफंडचा कालावधी वाढला

कोरोना काळातील रिफंडचा कालावधी वाढला

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या संबंधीचे तिकीट रद्द करण्यासाठीचा कालावधी तीन दिवसांवरुन तीन महिने इतका करण्यात आला होता. मे महिन्यात या कालावधीत वाढ होऊन तो सहा महिने करण्यात आला. काऊंटरवर तिकीट रद्द करण्यासाठी होत असलेली गर्दी आणि कोरोनाचा प्रसार पाहता हा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला होता. हा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी अजून हजारो प्रवाशांचे तिकीट रद्द होऊ शकले नाही. त्यामुळे आता पुन्हा या कालावधीत अजून वाढ करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने मागील वर्षी २०२० मधील कोरोना काळातील २१ मार्च ते ३० जून या दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या होत्या. आता त्या संबंधी बुकिंगचे पैसे रिफंड करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना त्यांच्या बुकींगचे पैसे मिळवण्यासाठी अधिकचा वेळ मिळू शकतो. मंत्रालयाने सांगितले की, लॉकडाऊनच्या आधी तिकीटाचे बुकिंग केल्याच्या तारखेपासून पुढच्या नऊ महिन्यापर्यंत ते तिकीट रद्द करता येऊ शकेल आणि त्याचा परतावा मिळू शकेल. या आधी सहा महिन्याचा कालावधी झाल्यानंतर काही प्रवाशांनी आपल्याला रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकीटांचे पैसे परत मिळावे अशी मागणी केली होती. त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत. कोरोना काळातील रद्द झालेल्या नियमित गाड्यांच्या तिकीटांचे पैसे परत घेण्याचा सहा महिन्याचा कालावधी वाढवून तो आता नऊ महिने इतका करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठी दिलासाजनक बातमी दिली आहे. रेल्वेने वाढवलेल्या मुदतीमुळे हा रिफंड मिळवण्यासाठी प्रवाशांना पुरेसा असा वेळ मिळणार आहे.

दरम्यान रेल्वेच्या आरक्षणाची सेवा आणि चौकशीची सेवा नऊ जानेवारीच्या मध्यरात्री साडेतीन तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. उत्तर रेल्वे मुख्यालय आपल्या दिल्लीतील पॅसेन्जर रिझर्वेशन सिस्टिम अपग्रेड करणार असल्याने नऊ तारखेला रात्री ११.४५ पासून मध्यरात्री ३.१५ पर्यंत पीआरएस संबंधी सर्व सेवा बंद करणार आहेत. त्यामुळे या काळात रेल्वे आरक्षण करता येऊ शकणार नाही. त्याचसोबत रेल्वेची चार्टिंग आणि १३९ नंबरची चौकशी सेवा बंद राहणार आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील ई-तिकीटांची सेवाही बंद राहणार आहे.

त्याचप्रमाणे, विविध खेळातील खेळाडूंना रेल्वेच्या प्रवासासाठी तिकीटाच्या रकमेत सूट मिळावी अशी मागणी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments