Monday, March 1, 2021
Home India News रिलायंसची रिटेल मध्ये उडी, अमेझॉनला धक्का

रिलायंसची रिटेल मध्ये उडी, अमेझॉनला धक्का

आर्थिक अडचणीत सापडलेल्या फ्युचर ग्रृपने अ‍ॅमेझॉनशी २०१९ मध्ये ४९ टक्के भागिदारीचा करार करत २००० कोटी रुपये घेतले होते. या करारानुसार फ्यूचरला दुसऱ्या कोणत्याही कंपनीसोबत करार करण्या अगोदर अ‍ॅमेझॉनला माहिती कळवणं बंधनकारक असेल असं म्हटलं आहे. मात्र, फ्युचर गृपने हा करार करण्याअगोदर अ‍ॅमेझॉनला कळवलं नाही. असं अ‍ॅमेझॉनचं म्हणणं होतं. अ‍ॅमेझॉनने भारतीय सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्सचेंज बोर्ड आणि नियामक एजन्सीकडे तक्रार केल्यानंतर कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीने आपली मालमत्ता फ्यूचर ग्रुपच्या रिलायन्सला विक्री करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे.  देशातील मोठी कंपनी असलेल्या रिलायंसने रिटेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. रिटेल क्षेत्रातील मोठा उद्योग समुह असलेया फ्यूचर उद्योग समुहाचे असेट्स रिलायंसने विकत घेतले होते. आर्थिक अडचणीत असलेल्या किशोर बियाणी यांच्या फ्यूचर उद्योग समूहाची रिलायंस रिटेल ने खरेदी केली खरी मात्र, हा व्यवहार अ‍ॅमेझॉनने आक्षेप घेतल्यानं अडचणीत सापडण्याची शक्यता होती. अ‍ॅमेझॉनने भारतीय सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्सचेंज बोर्ड आणि अनेक नियामक एजन्सीकडे या संदर्भात तक्रार केली होती. कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेल्या फ्यूचर उद्योग समुह आणि रिलायंस रिटेलने २४ हजार ७१३ कोटी रुपयांना खरेदी केले.

आता बिग बाजारची मालकी रिलायंस कडे गेली आहे. फ्यूचर रिटेल या कंपनीकडे बिग बाजार पासून, फूड हॉल, निलगिरीज, FBB, Central, ब्रँड फॅक्टरी, हेरिटेज फूड हे सगळे रिटेल ब्रँड रिलायन्सकडे येणार आहेत. या व्यवहारानंतर रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड च्या संचालक ईशा अंबानी यांनी आनंद व्यक्त केला असून फ्यूचर ग्रुप चे नाव आम्ही बदलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनच्या दरम्यान फ्यूचर उद्योग समुहाचे अनेक स्टोअर्स बंद पडले. फ्यूचर उद्योग समूहाचे १८०० पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत. रिलायन्स रिटेलकडे सध्या ११,७८४ स्टोअर्स आहेत. फॅशन, फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, प्रीमिअम फॅशन यापासून ते किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कनेक्टिव्हिटीपर्यंत सगळे उद्योग RIL च्या छत्राखाली आहेत.  त्यामुळं या उद्योग समुहाशी हजारो लोक जोडले गेलेले आहेत. या लोकांवर लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड पडण्याची शक्यता होती. मात्र, आता रिलायंस ने फ्युचर उद्योग समुह खरेदी केल्याने हजारो लोक बेरोजगार होता होता राहिली. रिलायन्स रिटेलची गेल्या वर्षातली उलाढाल १,६३,०००  कोटी रुपये एवढी होती. आता नव्या करारांमुळे आणि नव्या कंपन्या जोडल्या गेल्यामुळे यात मोठी वाढ होणार आहे.

अ‍ॅमेझॉनने फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स यांच्यातील या महत्त्वाच्या कराराला विरोध केला होता. यासंदर्भात अ‍ॅमेझॉनने दिल्ली उच्च न्यायालयातही धाव घेतली. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयाने २१ डिसेंबर २०२० रोजीच्या निर्णयात अ‍ॅमेझॉनची याचिका फेटाळली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments