Sunday, February 28, 2021
Home India News शेहला रशीद यांना देशद्रोही जाहीर करण्याची पित्याची मागणी

शेहला रशीद यांना देशद्रोही जाहीर करण्याची पित्याची मागणी

शेहला रशीद या काही ना काही कारणाने कायम चर्चेत असतात. यांनी एनआयटी श्रीनगर मधून इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी इंजिनिअर म्हणून काही दिवस नोकरी केली परंतु नंतर त्या सामाजिक आंदोलनांशी जोडल्या गेल्या. फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयूचे तत्कालीन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपांत अटके नंतर शेहला यांनी आंदोलन केल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. जेएनयू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या शेहला रशीद यांच्यावर त्यांचे पिता अब्दुल रशीद शौरा यांनी देशद्रोहाचा आरोप केला आहे. शेहला आणि तिची आई अब्दुल देशविरोधी कारवायांत सहभागी असल्याचंही यांनी म्हटले आहे. याला प्रत्यूत्तर देताना शेहला यांनी पित्याचे आरोप निरर्थक असल्याचे म्हटले आहे. आई, बहिण आणि आपण घरी सर्वांना मारहाण करणाऱ्या पित्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा सूड म्हणून पित्यानं आपल्यावर असे देशद्रोहाचे आरोप केल्याचं शेहला यांनी म्हटले आहे.

आपल्या पत्नी, मुलीवर गंभीर आरोप करणाऱ्या अब्दुल रशीद यांनी जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांना या संदर्भात पत्र व्यवहार केला आहे. या पत्रात त्यांनी शेहला हिने एका काश्मीर व्यावसायिक असलेल्या जाहूर अहमद शाह वताली याच्याकडून तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे, काश्मीरमध्ये हुर्रियत सारखी नवी संघटना उभारण्याचा शेहला हिचा प्रयत्न होता असाही आरोप तिच्या पित्याने केला आहे.

शेहला रशीद यांचे पिता अब्दुल रशीद शौरा यांना ऑक्टोबर महिन्यापासून श्रीनगरच्या मुन्सिफ न्यायालयानं घरगुती हिंसाचार प्रकरणात घरी जाण्यापासून रोखलंय. शेहला रशीद, मोठी मुलगी अस्मा रशीद, पत्नी जुबैदा आणि सिक्युरिटी गार्ड साकिब अहमद यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत अब्दुल रशीद यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्याला आपल्या घरात प्रवेश मिळावा, यासाठी पोलिसांनी मदत करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटल आहे. शेहला रशीद हिच्या बँक अकाऊंट तथा ई-मेलची चौकशी व्हावी, अशी मागणी अब्दुल यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

शेहला रशीद यांनी जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला विरोध केला होता. १८ ऑगस्ट २०१९ रोजी अनेक ट्विट करत भारतीय लष्कराकडून काश्मिरी जनतेवर अत्याचार करण्याचे आरोप शेहला यांनी केले होते. सेनेकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शेहला यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments