Friday, February 26, 2021
Home India News सौरव गांगुलीची पुन्हा अँजिओलपास्टी

सौरव गांगुलीची पुन्हा अँजिओलपास्टी

बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे. काल रात्री त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. काही दिवसांपूर्वी गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्याच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर डिस्चार्ज घेऊन तो घरी परतला होता. पण, आता पुन्हा त्याच्या छातीत दूखायला लागले आहे. गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे, असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हा आयुष्याचाच एक भाग आहे, अशा गोष्टी घडतच राहतात. आपणच त्यातून सावरले पाहिजे. आता मी पूर्णपणे बरा आहे. किंबहुना येत्या काही दिवसांमध्येच या परिस्थितीवर माझं शरीर कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहत मी कामाला सुरुवात करणार आहे’. दरम्यान, गांगुलीनंतर त्याचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीचीही कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये एंजिओप्लास्टी करण्यात आली होती.

Sourav Ganguly with family

यापूर्वी ९ सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले ज्याने गांगुलीला त्याच्या कोरोनरी रक्तवाहिन्यां मधील उर्वरित अडथळ्यांसाठी आणखी एंजिओप्लास्टीची गरज नसल्याचा ठरवलं होतं. कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात गांगुलीला पुन्हा एकदा दाखल झाल्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही अतिशय चिंताजनक बाब आहे. यापूर्वी गांगुली जेव्हा रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा त्यांच्या टेस्ट घेण्यात आल्या होत्या ज्यामध्ये त्यांना सौम्य ह्रदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं होत.

बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून सौरवने गुलाबी बॉल टेस्टमधेही भारताने स्थान मिळवून द्यायला मोलाचे काम केले आहे. २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गांगुलीने ११३ टेस्ट आणि ३१० वनडे सामने खेळले आहेत. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २१ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथे दोन दशकांहून अधिक काळानंतर कसोटी सामना जिंकला आहे. गांगुलीच्याच नेतृत्वात संघाने पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकली आहे. २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर चाहत्यांचा विश्वास ढासळलेला असताना त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने उल्लेखनीय कमबॅक केलं. २००३ आयसीसी क्रिकेट विश्वचषकच्या अंतिम सामन्यातही भारताने प्रवेश मिळविला परंतु जोहान्सबर्ग येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सौरव गांगुलीच्या तब्बेतीमध्ये सुधारणा घडून येण्यासाठी चाहत्या वर्गाकडून प्रार्थना केल्या जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments