Friday, February 26, 2021
Home India News रिलायन्सला मागे टाकून टाटा अव्वलस्थानी

रिलायन्सला मागे टाकून टाटा अव्वलस्थानी

टाटा समूहाच्या कंपन्यांची एकूण मार्केट कॅप आज १७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एचडीएफसी ग्रुपच्या तुलनेत सुमारे टाटा ग्रुप दोन लाख कोटींनी पुढे आहे. एचडीएफसी समूहाची मार्केट कॅप १५.२५ लाख कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात टाटा समूहाच्या कंपन्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली, एका वर्षात या समूहाची मार्केट कॅप ४२ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे टाटा समूहाची मार्केट कॅप गेल्या एका महिन्यात १३ टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच एका महिन्यात या टाटा ग्रुपने आपल्या बाजार भांडवलात १.९ लाख कोटींची भर घातली आहे.

टाटा ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या देशातील दोन मोठ्या व्यावसायिक घरांमधील स्पर्धा जुनी आहे. कधी मुकेश अंबानींची कंपनी RIL ची मार्केट कॅप टाटा समूहापेक्षा जास्त असते तर कधी टाटा ग्रुपची मार्केट कॅप जास्त असते. गेल्या वर्षी जुलैमध्ये रिलायन्सने टाटा ग्रुपला मागे टाकत देशातील अव्वल व्यावसायिक म्हणून स्थान मिळवलं होतं. परंतु अवघ्या महिन्यांत टाटा ग्रुपने आपलं स्थान पुन्हा मिळवले.

मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत प्रत्येक वस्तूची निर्मिती करणारा टाटा ग्रुप आपल्या फ्लॅगशिप कंपनी TCS च्या बळावर मार्केट कॅपच्या बाबतीत पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठा ग्रुप बनला आहे. तर मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स समूहाचं बाजार मूल्य घसरलं आहे. आता रिलायन्स बाजार मुल्याच्या बाबती तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर एचडीएफसी  ग्रुप दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स समूहाची मार्केट कॅप २७ टक्क्यांनी वाढली आहे. तर एचडीएफसी समूहामध्ये केवळ ११ वाढ झाली आहे. टाटा ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये तेजीचे सर्वात मोठे कारण म्हणजे मागील महिन्यात आपल्या २८ लिस्टेड कंपन्यांपैकी १८ कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. जुलै २०२० मध्ये टाटा ग्रुपच्या १७ लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केट कॅप ११.३२ लाख कोटी रुपये होती. तर रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप १३ लाख कोटींच्या पुढे गेली होती. त्यानंतर रिलायन्स समूहाने टाटा समूहाला मार्केट कॅपच्या बाबतीत मागे टाकलं होतं.

tata tops reliance

मात्र त्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू झाली आणि मार्केट कॅप १२.२२ लाख कोटी रुपये राहिला. तर दुसरीकडे टीसीएस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टीलसह टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळे टाटा समूहाची एकूण मार्केट कॅप १६.६९ ला कोटींच्या पुढे गेली. जी रिलायन्स समूहापेक्षा सुमारे ३६ ट्क्के अधिक आहे. टीसीएस शेअर्समधील या तेजीचे कारण म्हणजे कोरोना संकटाच्या काळातही कंपनीने बरेच मोठे करार केले. स्टीलच्या वाढत्या किंमतींचाही टाटा स्टीलला मोठा फायदा झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments