Friday, February 26, 2021
Home India News ४ खासदारांचा कार्यकाल समाप्त

४ खासदारांचा कार्यकाल समाप्त

राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्य काळ पूर्ण झाला आहे. त्यांच्यासोबत शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी बोलत होते. सोमवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांचे वेगळे रुप पाहायला मिळाले होते. काल त्यांनी- आंदोलनजीवी, फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी आणि जी-२३, अशा शब्दांचा उल्लेख केला होता. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांवर टोकी करताना चार माजी पंतप्रधानांचाही उल्लेख केला.

राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांच्याबद्दलचे अनुभव कथन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या सोबत असलेल्या आपल्या मैत्रीचा उल्लेख केला. दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांनी मला फोन केला आणि ते फोनवर खूप रडले. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आझाद यांच्याशी माझे कायम मैत्रीचे नाते आहे. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका केल्या परंतु, त्यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदर आहे आणि राहील. आझादजी त्यावेळेस कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे चिंता करायचे. मोदींनी यावेळी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला, ज्यात गुजरात मधील लोकांचा मृत्यू झाला होता. मोदी म्हणाले की, त्या हल्ल्यानंतर सर्वात आधी माझ्याकडे गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हता. फोनवर त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळेस प्रणब मुखर्जीजी संरक्षण मंत्री होते. मी त्यांना विनंती केली की, मृतदेह आणण्यासाठी विमानाची गरज आह. ते म्हणाले की, मी व्यवस्था करतो. त्यानंतर रात्री परत एकदा आझादजी यांचा फोन आला होता. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणाऱ्यांना गुलाम नबी आझाद यांनी त्या पदाला दिलेली उंची गाठण्यासाठी कष्ट करावे लागतील. गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या पक्षासोबत देशाची आणि राज्यसभेची काळजी असायची, असं मोदी म्हणाले. गुलाम नबीजी यांनी आपल्या बंगल्यात जी बाग बनवली आहे, ती काश्मीरमधील घाटीची आठवण करुन देते.

शरद पवार यांनीही एक किस्सा सांगितला. पवार म्हणाले की, गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात. पण, १९८४ च्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातील वाशिममधून निवडणूक लढवायचे ठरवले होते. वाशिम सारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नव्हते. पण आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात असल्यामुळे गुलाम नबी यांना पाडायचे खूप प्रयत्न केले. आमच्या प्रचंड प्रयत्नानंतरही आझाद यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला, असे पवार म्हणाले. गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभा, लोकसभेतही खासदार म्हणून काम पाहिले. त्यांनी मंत्री म्हणून अनेक खात्याचा कारभार पाहिला. जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जाते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी देशहितासाठी नेहमीच महत्त्व दिले आहे. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments