Monday, March 1, 2021
Home India News सिरमच्या लसीचा पहिला टप्पा झाला रवाना

सिरमच्या लसीचा पहिला टप्पा झाला रवाना

१६ जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून लसीचा पहिला टप्पा रवाना झाला आहे. लस देशभरात वितरीत केली जाणार आहे, ते स्पष्ट केलेले नाही. लस कोणत्या राज्यांना पाठवण्यात आली याबाबत सिरमकडूनच माहिती मिळू शकेल. पोलिसांनी लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना एअरपोर्टपर्यंत सुरक्षा देण्याचं काम केलं. मंगळवारी सकाळपासूनच सीरम इन्स्टिट्युटमध्ये लशीचे बॉक्स ट्रकमध्ये भरण्याचं काम सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार, लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना आतून सॅनिटाईज करण्यात आलं आहे.

भारतात पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धांना लस दिली जाणार आहे. देशभरातील कोरोनाविरोधी लढ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून लस देण्याची मोहीम सुरू केली जाईल. लसीकरण मोहीम योग्य पार पाडली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.  सामान्यांना एवढ्यात कोरोनाविरोधी लस मिळणार नाही. आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यास लसीकरण केलं जाणार आहे. त्यात ३० कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.

पंतप्रधानांनी लसीकरण बद्दल काही माहिती सांगितली आहे तो थोडक्यात पाहूया. भारतात कोरोनाचं संक्रमण इतर देशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण कमी झालं आहे. १६ जानेवारीपासून आपण जगभरातील सगळ्यात मोठी लशीकरण मोहीम आपण सुरू करत आहोत. ज्या दोन लशींना मंजुरी दिली, त्या दोन्ही मेड इन इंडिया आहेत, आणि ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. अजून ४ लसी मुंजरीच्या निर्णयात आहेत. या दोन्ही लशी जगभरातल्या इतर लसीपेक्षा कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. जर आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागलं असतं तर देशाची परिस्थिती किती बिकट झाली असती याची आपण कल्पना करू शकतो. देशातल्या सगळ्या बाबींचा विचार करून त्या तयार करण्यात आल्या आहेत.

लशीकरणात आधी कोरोना योद्धा, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना लस दिली जाईल. पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाईल. त्याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेलं. राज्यांनी पैसे द्यायची गरज नाही. दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लस दिली जाईल.  कोरोनाच्या लसीबाबत आपण पूर्णपणे शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निर्णय़ घेणार आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments