Sunday, February 28, 2021
Home India News लष्करप्रमुखांचे दूरदृष्टी भाष्य

लष्करप्रमुखांचे दूरदृष्टी भाष्य

देशापुढं असणाऱ्या आव्हानांची तीव्रता आणखी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, देशाच्या सीमांवर सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती आणि एकंदर वातावरण पाहता लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाची आक्रमता आणखी बळावण्याची गरज असल्याचं भाष्य केलं. मल्टी डोमेन ऑपरेशन्स बाबत सांगताना त्यांनी रणगाडे, हवेत आणि जमिनीवर मारा करणारी लढाऊ विमानं, सरफेस कॉम्बॅटन्ट जे एकेकाळी २० व्या शतकाच्या युद्धशास्त्राचे मुख्य आधार होते, पण नवीन डोमेनमधील उदयोन्मुख युद्धभूमीतील आव्हानांचा सामना करताना येत्या दिवसांमध्ये यातील अमुलाग्र बदलांकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. लष्करप्रमुखांचं भाष्य अशा वेळी करण्यात आलं आहे, जेव्हा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं सैन्य पॅगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन मागे हटत असल्याची माहिती दिली. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल. संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, भारतीय सैन्याने सर्व आव्हानांचा सामना केला. अनेक परिसराला चिन्हीत केले असून, तेथे सैन्य उपस्थित आहे. लडाखच्या उंच ठिकाणावरही आमचे सैन्य तैनात आहे. ज्या शहीदांच्या पराक्रमावर डिसएंगेजमेंट आधारित आहे, त्यांना हा देश नेहमी लक्षात ठेवेल. संरक्षण मंत्र्यांच्या राज्यसभेतील भाष्यापूर्वी चीन सरकारने दावा केला होता की, लडाखमध्ये LAC वर भारतासोबत नऊ महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपला आहे. बुधवारी दोन्ही देशाकडून एकसोबतच माघार घेण्यास सुरुवात झाली आहे. चीनच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेंसचे प्रवक्ते वू कियानने सांगितला की, चीन आणि भारता दरम्यान झालेल्या कमांडर लेव्हलच्या ९ व्या बैठकीत डिसइंगेजमेंटवर एकमत झाले होते. या अंतर्गत दोन्ही देशाने पँगॉन्ग हुनान आणि नॉर्थ कोस्टवरुन आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.

सेंटर ऑर लँड वॉरफेयर स्टडीजच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मल्टी डोमेन ऑपरेशन्स फ्यूचर ऑफ कॉन्फ्लिक्ट्स परिषदेमध्ये लष्कर प्रमुखांनी देशाच्या सीमा संरक्षणाबाबत महत्त्वाचं वत्तव्य केलं. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या सीमा भागांमध्ये जे काही सुरु आहे, ते पाहता आपण याबाबत विचार करण्याची गरज आहे. सीमांची योग्य आखणी नसल्यामुळं परिणामस्वरुपी क्षेत्रीय भाग आणि सार्वभौमत्वाच्या संरक्षणात मोठी आव्हानं उभी राहत आहेत,  असं ते म्हणाले. भविष्यात काही नवी आव्हानं उभी असतीलच यात कोणतीही शंका नाही ही बाब अधोरेखित करत ‘लेगसी चॅलेंज’ही फार दूर नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments