आंध्र प्रदेशात एका अज्ञात आजाराने लॉक आजारी पडत आहे. नक्की या रोगाची लक्षणे की आहेत आणि कशामुळे या रोगाची लागण होते आहे याचा शोध सुरु आहे. जवळपास ३०० जण रुग्णालयात दाखल झालेत. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पथक एलुरूला दाखल झाल आहे. आंध्र प्रदेशातील एलुरूमध्ये एका अज्ञात आजारानं थैमान घातलंय. या रहस्यमय आजारानं जवळपास ३०० लोक रुग्णालयात दाखल झालेत. या अज्ञात आजाराने एकाचा मृत्यूही ओढावला आहे
या आजारात अनेक लोक अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळत आहेत. अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. या नवीन आजारानं डॉक्टरही चक्रावले आहेत. दुषित पाणी किंवा अन्नाचं सेवन केल्यामुळे हा आजार झाला असल्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये. नवी दिल्लीतून आलेल्या टीमला रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यात शिसे आणि निकेल आढळून आले आहे. या आजारानं पीडित एक रुग्ण विजयवाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. या ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. चक्कर आल्यानंतर या रुग्णाला आकडी आली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आंध्र प्रदेशमधील एलुरुमध्ये चार वेगवेगळ्या भागांतून जवळपास ४५ रुग्णांमध्ये अजब लक्षणं आढळली होती. विशेष म्हणजे या रुग्णांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये ४६ मुलांचा तर ७० महिलांचा समावेश आहे. एलुरू शहराच्या सरकारी हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. एवी मोहन म्हणतात, “आम्ही अजून काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यांच्या अहवालाच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत.” हैदराबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमधले वैज्ञानिक याबद्दल म्हणतात, “एखाद्याला आकडी येणे यामागचं मुख्य कारण हे मेंदू किंवा मज्जासंस्थेशी निगडित असू शकतं. रक्ताच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या धातूंचा अधिक अभ्यास करून ते रुग्णांच्या शरीरात कसे पोहचले याची तपासणी सुरु आहे.”
भारतात एकीकडे कोरोनाचे’ मोठं संकट घोंघावत असतानाच आता आंध्र प्रदेशात एका अज्ञात आजाराची लाट आली आहे. गेल्या शनिवारच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०० जणांना या आजाराची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यात शिसे आणि निकेल या विषारी धातूंचं प्रमाण आढळलं आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४० हून अधिक रुग्णांवर उपचार यशस्वी ठरल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलंय. तर इतरांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचं त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.