Sunday, March 7, 2021
Home India News विरुष्काच्या घरी लक्ष्मी आली..

विरुष्काच्या घरी लक्ष्मी आली..

विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे विराट कोहलीने अनुष्का गरोदर असल्याची माहिती दिली होती. विराट आणि अनुष्काबद्दल हा खुलासा झाल्यानंतर दोघही ट्वीटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली होती. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.आता ‘विरुष्का’च्या मुलगी आगमन झालं असून सर्वजण तिची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

विराट कोहली आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी पॅटर्निटी लीव्हवर असून कसोटी मालिका सोडून तो ऑस्ट्रेलियाहून भारतात परतला आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळल्यानंतर त्याने अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीतही भाग घेतला. पण त्यानंतर, शेवटचे तीन कसोटी सोडून तो भारतात परत आला. त्याचप्रमाणे अनुष्काही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिच्या गरोदरपणाचा प्रवास तिच्या चाहत्यां सोबत शेअर करत होती. यादरम्यान अनुष्काने प्रसिद्ध वोग मॅगझिनसाठी फोटो शूट केलं होतं. ते फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावर सुद्धा काही प्रमाणत चांगल्या वाईट कमेंटचा सामना करावा लागला. अनुष्का गरोदरपणातही योगा आणि वर्कआउट करताना दिसून येत होती. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

virat kohli blessed with baby girl

विराटनं ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा सुंदर किस्सा आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे,असं विराटनं म्हटलं आहे. विराटने शेअर केलेल्या पोस्टला आतापर्यंत २६ हजार पेक्षा जास्त चाहत्यांनी लाईक केलं आहे.

सर्व स्तरातून अनुष्का आणि विराट वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे विरुष्काच्या मुलीच्या एका झलक साठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, तुमच्या शुभेच्छांसाठी मी आभार व्यक्त करतो. आमच्या जीवनात आम्हाला हा अनुभव घेता आला, याचा आम्हाला आनंद आहे. याक्षणी तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल, अशी मी आशा करतो.” या विराटने केलेल्या विनंतीवजा ट्वीटचा सुद्धा चाहते नक्कीच विचार करतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments