Monday, March 1, 2021
Home International News सेकंड लेडी ऑफ अमेरिका कमला हॅरिस यांच्याबद्दल थोडसं...

सेकंड लेडी ऑफ अमेरिका कमला हॅरिस यांच्याबद्दल थोडसं…

कमला हॅरिस आणि डग्लस एमहाफ यांची ओळख २०१३ मध्ये झाली होती. दोघांच्या देखील एका जवळच्या मित्राच्या ब्लाईंड डेटवेळी कमला आणि एमहाफ यांची ओळख झाली होती. एका वर्षाने २०१४ मध्ये एमहाफ यांनी कमला हॅरिस यांच्या समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. कमला हॅरिस यांनी त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारला. डग्लस एमहाफ देखील सोशल मीडियावर दोघांच्या प्रेमाबाबत लिहित असतात. आपल्या नात्याबद्दल सांगताना हॅरिसला भेटल्यानंतर पहिल्याच नजरेत प्रेम झाले असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. पहिल्या ब्लाइड डेटनंतर दोघांना आपण एकत्र राहू शकतो असे वाटले. त्यानंतर त्यांनी २०१४  मध्ये कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा येथील एका कोर्टात लग्न केले. एमहाफ यांचं कमला यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. त्यांची आधीची पत्नी क्रिस्टिन मैकिन हिच्यासोबत घटस्फोट झालाय. पहिल्या पत्नीपासून एमहाफ यांना दोन मुलं आहेत. पहिल्या भारतीय वंशाच्या तसेच आफ्रिकन अमेरिकन उपाध्यक्ष असणार आहेत. कमला हॅरिस यांच्यासोबत त्यांचे पती डग्लस एमहाफ यांनी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एमहाफ हे व्यवसायाने वकील आहेत. डग्लस एमहाफ यांना सेकंड जेंटलमॅन  नावाने आपले अधिकृत ट्विटर हँडल मिळाल्यानंतर तर ते अधिकचं प्रसिद्धी झोतात आले आहेत. शपथविधी झाल्यानंतर कमला या सेकंड लेडी ऑफ अमेरिका होतील आणि त्यांचे पती एमहाफ सेकंड जंटलमॅन ऑफ अमेरिका होतील. कमला हॅरिस यांचे पती डग्लस एमहाफ यांना ‘सेकंड जेंटलमॅन’ नावाने अधिकृत ट्विटर हँडल मिळाल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. त्यांच्या फॉलोअर्समध्ये जवळपास ५.५ लाखांनी वाढ झाली आहे.

दोघांनी आपल्या नातेसंबंधासह बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्या दरम्यान काढलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत डग्लस एमहाफ यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘जेव्हा तुम्हाला तुमच्या पत्नीकडून हे माहिती होतं की आपल्या पहिल्या ब्लाइंड डेट आधी तिने गूगल सर्च केलं होतं. कमला हॅरिस आणि डग्लस एमहाफ या दोघांनी सोशल मीडियावर स्वत:बद्दल आणि आपल्या नात्याबद्दल लिहिताना कधीच मागे पुढे पाहिले नाही. गेल्या वर्षी एमहाफच्या वाढदिवशी कमला हॅरिसने इन्स्टाग्रामवर दोघांचा एक सुंदर फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, आमच्या पहिल्या डेटनंतरची सकाळ. डग्लस एमहाफने मला पुढच्या काही महिन्यांसाठी आपल्या उपलब्ध तारखांची यादी ईमेल केली आहे.

कमला हॅरिस यांनी पती डग्लस एमहाफ यांच्याबद्दल सांगितले की, डग्लस पूर्णपणे प्रामाणिक आहे. ज्या गोष्टीची त्याला काळजी वाटते त्याबद्दल तो स्पष्ट आहे. आपले कुटुंब आणि काम याची तो खूप काळजी घेतो.’ कमला आणि डग्लस यांनी हे देखील सांगितले की, त्यांचे नातेवाईक जगभरात आहे. भारतात काही नातेवाईक आहेत तर काही अमेरिका आणि इटलीमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments