Friday, February 26, 2021
Home International News ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा लस मिळाल्यावर भन्नाट रिप्लाय

ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा लस मिळाल्यावर भन्नाट रिप्लाय

भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं लसीची मागणी केली होती. ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी तसं पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं. ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला भारतानं सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार मानले. भारतात तयार झालेली कोरोनाची लस ब्राझील आणि मोरक्कोत पोहोचली. शुक्रवारी सकाळी ही लस भारतातून मुंबई विमानतळाहून ब्राझील आणि मोरक्कोच्या दिशेने रवाना झाली. लस मिळताच ब्राझीलचे राष्ट्रपती जैर एम बोलसोनारोने यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष प्रकारे आभार मानले आहेत.

जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार,’ असं म्हणत बोलसोनारो यांनी म्हटलं आहे. बोलसोनरो यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिला आहे. बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

जगातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा आता काही ठिकाणी कमी झाला असला तरी जगात बऱ्याच देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येत आहे. दरम्यान, जगातील विविध देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलने मदतीसाठी हात पुढे केला होता. भारतानेही ब्राझीलला लस पुरवठा करण्यास परवानगी दिल्यानंतर राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचे छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही,  याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे, असं बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं होतं. भारत सरकारनं आतापर्यंत बांगलादेशात २० लाख तर नेपाळमध्ये १० लाख कोरोना व्हॅक्सिनचे डोस पाठवले आहेत. तर भूतान आणि मालदीव यांना अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख डोस पाठवून भारतानं मदत केली आहे. भारतीय व्हॅक्सिनला जगभर मागणी आहे. जवळपास ९२  देशांनी भारताकडून कोरोना व्हॅक्सिन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments