Saturday, March 6, 2021
Home International News अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांचा सीइओ पदाला रामराम

अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांचा सीइओ पदाला रामराम

जेफ बेझोस यांनी सन १९९४ साली अॅमेझॉनची स्थापना केली होती. सुरुवातीला केवळ एक ऑनलाईन बुकस्टोअर असलेल्या अॅमेझॉनचे रुपांतर आज जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनीमध्ये झाले आहे. अॅमेझॉनकडून आज जगातील सर्व प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. आपल्या कर्मचाऱ्यांना जेफ बेझोस यांनी एक पत्र लिहून अॅन्डी जेसींकडे कंपनीच्या सीईओपदाची धुरा सोपवत असल्याचे सांगत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आपल्या पत्रात ते म्हणाले की, अॅमेझॉन कंपनीचा मला बोर्डचे कार्यकारी अधिकारी आणि अॅन्डी जेसी यांनी सीईओ बनवण्यात आले आहे,  मला याचा आनंद होत आहे. या नव्या भूमिकेत काम करताना मी नव्या उत्साहाने आणि उमेदीने काम करेन. अॅन्डी जेसीवर माझा पूर्ण भरवसा आहे. आपल्या पत्रात जेफ बेझोस यांनी पुढे म्हटले आहे की, जवळपास २७ वर्षापूर्वी हा प्रवास सुरु झाला होता. अॅमेझॉन केवळ एक विचार होता,  त्यावेळी त्याचे काहीच नाव नव्हते. मला त्यावेळी विचारण्यात यायचे की इंटरनेट काय आहे? आपण आज १३ लाख प्रतिभावान आणि कामाप्रती निष्ठा बाळगणाऱ्या लोकांना रोजगार देत आहोत. आम्ही कोट्यवधी ग्राहकांना आपली सेवा पुरवतो आहे.

बेझोसचा जन्म न्यू मेक्सिकोच्या अल्बुकर्क येथे झाला आणि तो टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये मोठा झाला. आपल्या कष्टानं सगळं काही जिंकता येत हे खरं आहे. याचंचं एक उत्तम आणि प्रेरणादायी उदाहरण समोर आलं आहे. एका तरुणाने इतरांप्रमाणेच इंजिनिअरिंग केली आणि अनेक बड्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. इतकंच नाही तर नोकरीदरम्यान त्याने अमेरिका पालथी घातली. यावेळी लोकांना वस्तू खरेदी करण्यामध्ये अडचणी येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. इंटरनेटचं उत्तम ज्ञान असल्यामुळे त्याने नोकरी सोडली आणि इंटरनेटच्या माध्यामातून ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरू केला. १९८६ मध्ये त्यांनी प्रिंटन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व संगणक विज्ञान पदवी संपादन केली. त्यांनी १९८६ ते १९९४ च्या काळात वॉल-स्ट्रीट मध्ये विविध संबंधित क्षेत्रात काम केले. न्यूयॉर्क शहर ते सिएटल पर्यंतच्या क्रॉस-कंट्री रोड ट्रिपवर १९९४ च्या उत्तरार्धात त्यांनी ऑनलाइन विक्रेती अ‍ॅमेझॉन कंपनीची स्थापना केली.

अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांनी आपल्या पदाला रामराम केला असून त्यांची जागा आता कंपनीच्या क्लाऊड कम्युटिंग चिफ असलेल्या अॅन्डी जेसी घेणार आहेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत हा बदल करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जेफ बेझोस यांची निवड कंपनीचे बोर्ड कार्यकारी अध्यक्ष म्हणून केली असल्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments