Monday, March 1, 2021
Home International News अमेरिकेचे पुन्हा मिशन मून

अमेरिकेचे पुन्हा मिशन मून

फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर मध्ये उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी या अंतराळ चमूची ओळख करून दिली. या मिशन मध्ये राजा यांना २०१७ मध्येच टीम मध्ये सामील करून घेतले होते. तेव्हापासून या अंतराळविरांना प्रशिक्षण दिले जात होते. योजलेल्या आर्टेमिस मून मिशन साठी अंतिम १८ अंतराळवीरांची लिस्ट तयार केली आहे. या १८ मध्ये निम्मी संख्या महिला अंतराळवीरांची आहे. महिला अंतराळवीर सर्व प्रथमच चंद्रावर पाठवण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही सुरु केली गेली आहे. या यादीत भारतवंशीय अमेरिकन राजा चारी यांचीही निवड झाली आहे. २०२४ मध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. २०२४ मध्ये चंद्रावर जाणारया या अंतराळ यानातून प्रथम महिला अंतराळवीर चंद्र भूमीवर उतरेल आणि नंतर पुरुष अंतराळवीर उतरेल असे नासाने यापूर्वीच जाहीर केले आहे. दशकांअखेर चंद्रावर एक कायम स्वरूपी तळ उभा करण्याचे ध्येय नासाने ठेवले असून त्यानंतर अंतराळ प्रवास उड्डाण कराराची घोषणा केली जाणार आहे.

अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठविण्यासाठी भारतवंशीय राजा चारी यांचे वडील श्रीनिवास चारी हे हैद्राबाद येथून अमेरिकेत गेले होते. उच्च शिक्षण घेऊन यशस्वी करिअर घडविण्याचे त्यांचे ध्येय होते. अमेरिकेतील मुलीशी विवाहबद्ध झाल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. राजा कजरी यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी अमेरिकाच आहे. राजा चारी यांनी नासाच्या पदवीदान समारंभामध्ये असे सांगितले, “माझे वडील शिक्षणाचे महत्व चांगलेच जाणून आहेत, त्यामुळे त्यांनी मला त्याप्रमाणेच घडविले आहे. त्यांचा आदर्श घेत मी आजवरची वाटचाल केली”. चारी यांचे अनेक नातेवाईक आजही भारतात आहेत. ४१ वर्षीय राजा चारी यांनी अमेरिकेत एअरफोर्स अॅकॅडमी मधून एरोनोटीकल इंजिनीअर पदवी घेतली असून एमआयटी आणि युएस नेव्हल टेस्ट पायलट स्कूल मधून शिक्षण घेतले आहे

“चंद्रावर अमेरिकेने ठेवलेले पहिले पाऊल” या मिशनने इतिहास घडविला. या घटनेचा सुवर्णमहोत्सव गेल्या वर्षी साजरा केला गेला होता. त्यानंतर आता पुन्हा अमेरिकेने पुन्हा मानवाला चंद्रावर पाठविण्याचा चंगच बांधला आहे. भारतीय वंशाचा राजा चारी, कोरिअन वंशाचा लेफ्टनंट जॉनी किम, इराणी वंशांची जस्मिन मोघबेलीया तीन अंतराळवीरांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनिता विलियम्स यांनी नासाच्या अंतराळ मोहिमेत अंतराळवीर म्हणून कामगिरी बजावली आहे. चारी यांचा या यादीत तिसरा क्रमांक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments