Friday, February 26, 2021
Home International News पाकिस्तानात Anti-Rape कायदा मंजूर

पाकिस्तानात Anti-Rape कायदा मंजूर

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बलात्कार विरोधी कायद्याच्या २०२० विधेयकावर स्वाक्षरी केल्यावर त्याचे रुपांतर कायद्यात झाले आहे. बलात्कार विरोधी कायदा २०२० असे या कायद्याचे नाव आहे. पाकिस्तान मध्ये काही महिन्यांपूर्वी धावत्या वाहनात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर या कायद्याबाबत गंभीर विचार सुरु झाला. सप्टेंबर २०२० मध्ये वाहनातून आपल्या मुलासोबत निघालेल्या एका विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पाकिस्तानात घडली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. सिंध प्रांतातील काशमोर जिल्ह्यत एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलासोबत ही घटना घडली होती. या घटनेनंतर पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांचे सरकार बलात्कार विरोधी कायदा आणेल असे सांगितले होते. दरम्यान, पाकिस्तानमध्ये बलात्कार विरोधी कायद्यांतर्गत दोषी व्यक्तीला नपुंसक बनविण्याचा कायदा प्रथमच करण्यात येत आहे. परंतू, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दोषीची परवानगी घेणेही आवश्यक असणार आहे.

बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार आदी घटनांमुळे केवळ भारतच नव्हेत तर जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. खरे तर ही एक जागतिक समस्या होऊन भसली आहे. यावर पाकिस्तान सरकारने एक कडक कायदा राबविण्याचा निर्धार केला असून,  नुकतीच या कायद्याला मंजूरीही दिली. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी  यांनी या कायद्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यावर त्याचे रुपांतर कायद्यात झाले आहे. बलात्कार विरोधी कायदा २०२० असे या कायद्याचे नाव आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देशभरात एक व्यवस्था बनविण्यात येणार आहे. या कायद्यांतर्गत चालणाऱ्या सर्व खटल्यांची सुनावणी अवघ्या ४ महिन्यांत करावी लागणार आहे.

कसे असेल या कायद्याचे स्वरूप जाणून घेऊया थोडक्यात, नव्या कायद्यामध्ये अनेक प्रकारच्या महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. जर पोलीस किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे तपास झाला नाही, तर अशा व्यक्तींना दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. वारंवार गुन्हा करणार्यांना नपुंसक केले जाण्याची तरतूद कायद्यात केली आहे. या कायद्याच्या माध्यमातून नॅशनल डेटाबेस एंड रजिस्ट्रेशन अथॉरिटीच्या माध्यमातून देशभरातील लैंगिक अपराधात दोषी असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार केली जाईल. त्यासाठी अॅटी रेप क्रायसीस सेल बनविण्यात येईल. तसेच, आरोपी आणि पीडितेची घटना घडल्यानंतर अवघ्या ६ तासात वैद्यकीय चाचणी केली जाईल. तसेच या घटनेतील पीडित आणि आरोपीने ही चाचणी स्वत:हून करुन घेणे बंधनकारक असेल. बलात्कार करणार्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी तरी देण्यात यावी नाहीतर नपुंसक करण्यात यावे, असे कठोर शासन केल्याने गुन्हा करणाऱ्याच्या मानत भीती निर्माण होइल, असे इमरान खान म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments