Friday, February 26, 2021
Home International News बिलगेट्स यांची चिंताजनक भविष्यवाणी

बिलगेट्स यांची चिंताजनक भविष्यवाणी

बिल गेट्स यांनी काही वर्षापूर्वीच करोनासारख्या एका महासाथीच्या आजाराची शक्यता वर्तवली होती. विषाणूच्या फैलावामुळे नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, विमान प्रवास करण्यासही नागरीक हिम्मत करणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. कोरोनाच्या थैमानामुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेले आहे. कोरोना महासाथीचा आजार हा शेवटचा आजार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटने सह अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. कोरोनासारख्या महासाथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आवाहन केले आहे. नवीन साथ रोखण्यासाठी त्याबाबत आताच विचार करून आरोग्य व्यवस्थेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी २०२१ सालासाठीचे एक खुलं वार्षिक पत्र जाहीर केले होते. त्यात त्यांनी ही बाब नमूद केली होती. कोरोना महासाथीच्या आजारामुळे समाजातील असमानता समोर आली असल्याचे बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे आरोग्यक्षेत्रातील अनेक असमानता तीव्र झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, विशिष्ट समुदाय, गरीब आणि स्त्रिया यांना दिली जाणारी असमानतेची वागणूक प्रामुख्याने समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आगामी काळातील संकटांबाबत भाष्य केले आहे.

कोरोनानंतरच्या काळात हवामान बदल आणि जैविक दहशतवादाचे संकट येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. युट्युबवरील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते. कोरोनासारख्या महामारीच्या आजारा बाबतही त्यांनी आधीच इशारा दिला होता.  बिल गेट्स यांनी सांगितले की, कोणत्याही महासाथीच्या आजाराच्या तुलनेत दरवर्षी हवामान बदलामुळे अधिक मृत्यूंची नोंद होणार आहे. त्याशिवाय जैविक दहशतवादाचेही संकट उभं राहणार आहे. जगाला उद्धवस्त करण्यासाठी कोणीही विषाणूची निर्मिती करू शकतो. कोरोना महासाथीच्या आजाराच्या तुलनेने ही दोन संकटे जगभरात अधिक थैमान घालू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

बिल गेट्स यांनी सांगितले की, कोणत्याही महासाथीच्या आजाराला जगभरात रोखता येणे शक्य नाही. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी संभाव्य तयारी आधीच करायला हवी. श्वसनाशी निगडीत काही विषाणू अतिशय धोकादायक असतात. हे विषाणू मानवांमध्ये फैलावत असतात. काही वेळेला त्यांची बाधा झाली असली तरी समजत नाही. इबोलासारख्या आजाराची बाधा झाल्यानंतर बाधित व्यक्तिची प्रकृती ढासळते. त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करावे लागते. विषाणूमुळे होणाऱ्या सामाजिक व आर्थिक परिणामावर उपाय म्हणून सर्वाना भेदभाव न करता एकत्र समाविष्ट करून प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments