Friday, February 26, 2021
Home International News बायडन पर्वाची शांततेत सुरुवात

बायडन पर्वाची शांततेत सुरुवात

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी कार्यक्रमात अमेरिकन लोकांकडून धोका असणाची ही पहिलीच वेळ आहे. ७ जानेवारी रोजी, इलेक्टोरल वोटच्या काउंटिंगदरम्यान कॅपिटल हिलच्या आत आणि बाहेर हिंसाचार झाला होता. त्यावेळी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेच्या आत घुसून तोडफोड केली. म्हणून अमेरिकेच्या सुरक्षा संस्था अधिक खबरदारी घेत आहेत.

अमेरिकेला आज ४६ वे राष्ट्राध्यक्ष मिळाले. डेमोक्रेट जोसेफ आर बायडेन ज्यूनियर म्हणजेच जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. कार्यक्रम कॅपिटल हिल म्हणजेच अमेरिकेच्या संसदेत बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता म्हणजेच भारतीय वेळ रात्री १०.३० वाजता होईल. बायडेननी केवळ ३५ शब्दांमध्ये शपथ घेतली. हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे भव्य असणार नाही. कोरोना व्हायरसमुळे जास्त गर्दी जमणार नाही. यावेळी केवळ एक हजार ते १२०० लोक शपथविधीमध्ये सहभाग घेऊ शकतील, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते.

हिंसाचाराच्या भीतीच्या छायेत बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी अत्यंत शांततेत पार पडला. जो बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले. राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्याच्या काही तासांनंतरच बायडेन हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी तात्काळ १७ एग्जीक्यूटिव्ह ऑर्डर्सवर सही केली. सर्वात पहिले त्यांनी मास्क घालणे अनिवार्य करणाऱ्या ऑर्डरवर सही केली. पाच इंच बायबलवर हात ठेवून ३५ शब्दांत शपथ घेतल्यानंतर अध्यक्ष बायडेन यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, हा लोकशाहीचा दिवस आहे, इतिहास आणि आशेचा दिवस, नवसंकल्पांचा दिवस आहे. दरवेळी नवी परीक्षा होत असते. प्रत्येक वेळी अमेरिका त्यातून सावरते. आज आपण विजयाचा आनंदोत्सव साजरा करावा, परंतु हा एका उमेदवाराचा नव्हे, लोकशाहीचा विजय आहे. नागरिकहो, ही परीक्षेची वेळ आहे. आपल्या लोकशाहीवर हल्ला झाला. कोरोना, वंशवाद ही संकटे आली, परंतु, आपण एकजुटीने सामना केला. आता ऐतिहासिक संकट आणि आव्हाने समोर आहेत. परंतु, अमेरिकी एकात्मता हा मार्ग सुकर करेल. ही जबाबदारीही पार पाडत आपण आपल्या मुलांना नवे, समृद्ध जग दाखवू. असेच घडेल, हा मला विश्वास आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाइट हाऊस सोडले. शपथविधी सोहळ्यात उपस्थित न राहणारे १८६९ नंतर ते पहिले राष्टाध्यक्ष ठरले. डोनाल्ड ट्रम्प समारंभात सामील होणार नाहीत. त्यांची जागा व्हाइस प्रेसिडेंट माइक पेंस उपस्थित राहतील. यासोबतच माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा हे देखील उपस्थित होते. ट्रम्प यांनी व्हिडिओतून निरोपाचे भाषण केले. ते म्हणाले, मी तुम्हाला गुडबाय करू इच्छितो, परंतु अधिक काळ दूर राहणार नाही. दुसऱ्या एखाद्या रूपात मी परतेन. कार्यकाळात कोणतेही युद्ध न झालेला मी अमेरिकेचा पहिला अध्यक्ष ठरलो आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments