Monday, March 1, 2021
Home International News ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताकडून ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहूणे असणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली आणि भारतीय दौऱ्यावर येणं अशक्य असल्याचं सांगत खेद व्यक्त केला.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने त्या देशात पुन्हा एकदा सक्तीचे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या स्ट्रेनचे संक्रमण वेगाने पसरत आहे. ब्रिटनची स्थिती ही अत्यंत चिंताजनक आहे आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड दबाब आहे. गेल्या एका आठवड्यात ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत एक तृतीयांशने वाढ होऊन ती जवळपास २७  हजार इतकी झाली आहे. ही संख्या एप्रिल महिन्यातील रुग्णसंख्येच्या ४० % जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनने भारतातही शिरकाव केला असून भारतात आतापर्यंत ३८ रुग्ण सापडले आहेत. लॉकडाउनच्या घोषणेनंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून शाळा, कॉलेज, विद्यापीठाचे वर्ग ऑनलाइन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या घोषणेनंतर आता लोकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. बोरिस जॉन्सन यांनी देशाला संबोधित करताना म्हटले की, ज्याप्रकारे कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे, त्यानुसार आपल्याला त्याचा सामना करण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त अत्यावश्यक कामासाठी लोकांना घराबाहेर पडता येणार आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने सक्तीचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी देशातच राहण्याचा आणि आव्हानांचा सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बोरिस जॉन्सन आणि नरेंद्र मोदी यांनी भारत-युके यांच्यातील संबंधांचा पुनरुच्चार करत कोरोनाविरोधातील लढाईसह इतर मुद्द्यांवरही सहकार्य सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली. जी-७  शिखर संमेलन यंदा ब्रिटनमध्ये होणार आहे. त्यापूर्वीच म्हणजे आगामी सहा महिन्यातच भारताचा दौरा करण्याची आशा बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केली.

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये सोमवारी पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा केली. कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक फैलावू नये यासाठी कमीत कमी फेब्रुवारी मध्यपर्यंत नवीन स्टे-ऑन-होम लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जॉन्सन यांनी सोमवारी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments