Monday, March 1, 2021
Home International News ब्रेक्झिटला विरोध स्टेनली जॉन्सन यांची फ्रान्सच्या नागरिकत्वाची मागणी

ब्रेक्झिटला विरोध स्टेनली जॉन्सन यांची फ्रान्सच्या नागरिकत्वाची मागणी

२०१६ सालच्या जून महिन्यात सार्वमत चाचणीत ब्रिटनच्या जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर बरोबर साडे तीन वर्षांनंतर ब्रिटन अधिकृतपणे २७ सदस्य राष्ट्र असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडला आहे. गेली ११ महिने ही प्रक्रिया युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यातल्या व्यापार नियमांमध्ये अडकून पडली होती. या दोन्ही पक्षांमध्ये यापुढे व्यापार कसा करायचा, यावर गेली ११ महिने चर्चा सुरू होती. अखेर नाताळाच्या पूर्वसंध्येला या ऐतिहासिक व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. बुधवारी ब्रिटनच्या संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर या कराराचं कायद्यात रुपांतर झालं. नव्या यंत्रणे अंतर्गत उत्पादक कुठल्याही शुल्का शिवाय युरोपीय महासंघात व्यापार करू शकतात. याचाच अर्थ ब्रिटन आणि युरोपीय महासंघाची इतर राष्ट्रं यांच्यातल्या परस्पर व्यापारासाठी आयात शुल्क लागणार नाही. मात्र, ब्रिटनमधून युरोपीय महासंघातील देशात जाण्यासाठी किंवा तिथे व्यापार करण्यासाठी यापुढे जास्त पेपरवर्क करावे लागणार आहे.

पंतप्रधान बोरीस जॉन्सन २०१६ सालच्या लिव्ह कॅम्पेनचा प्रमुख चेहरा होते आणि पंतप्रधानपदी विराजमान होताच सहा महिन्यातच त्यांनी ब्रिटनला युरोपीय महासंघातून बाहेर काढले. हा अद्वितीय क्षण असल्याचं ते म्हणाले. नवीन वर्षाचा संदेश देताना ब्रिटन वेगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी आणि गरज भासल्यास युरोपीय महासंघातील आपल्या मित्रराष्ट्रांहून सरस कामगिरी करण्यास स्वतंत्र असल्याचे जॉन्सन म्हणाले. पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, “आपलं स्वातंत्र्य आपल्या हातात आहे आणि त्याचा पुरेपूर वापर कसा करायचा,  हेदेखील आपल्याच हातात आहे.” ब्रिटन पुन्हा एकदा पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र बनल्याचे ट्वीट ब्रेक्झिट चर्चेत ब्रिटनचे मुख्य प्रतिनिधी लॉर्ड फ्रोस्ट यांनी केले आहे. तर हा निर्णय म्हणजे लोकशाही आणि प्रभुत्वाचा विजय असल्याचे हुजूर पक्षाचे खासदार सर बिल कॅश म्हणाले.

ब्रेक्झिट मुद्द्यावरून केवळ बोरिस जॉन्सन आणि त्यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांच्यात मतभेद आहेत, असं नव्हे तर त्यांचे भाऊ आणि बहीण यांचाही ब्रेक्झिटला विरोध आहे. २०१६ साली झालेल्या सार्वमत चाचणीतही त्यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघासोबत राहवे,  बाहेर पडू नये,  या बाजूने मत दिलं होते. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या काही तास आधी प्रसारित करण्यात आलेल्या या मुलाखतीत स्टेनली जॉन्सन यांनी फ्रान्सचं नागरिकत्त्व स्वीकारण्यामागची कारणं सांगितली. ते म्हणाले, “याचा अर्थ मला फ्रेंच व्हायचं आहे, असा नव्हे. तर जे माझ्या जवळ आहे तेच मला पुन्हा प्राप्त करायचं आहे.” आपल्या आईचा जन्म फ्रान्समध्ये झाला आणि एका फ्रेंच आईचा मुलगा असल्या कारणाने ‘मी कायम एक युरोपीय असेन’, असं स्टेनली यांनी या मुलाखतीत सांगितलं. ८० वर्षांचे स्टेनली यांची १९७९ साली युरोपीय संसदेत निवड झाली होती. त्यावर्षी पहिल्यांदा थेट निवडणूक झाली होती. त्यानंतर त्यांनी युरोपीय कमिशनसाठी काम केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments