Monday, March 1, 2021
Home International News चीनचे चँग-५ यानाची चंद्रमोहीम फत्ते, यशस्वी कमबॅक..

चीनचे चँग-५ यानाची चंद्रमोहीम फत्ते, यशस्वी कमबॅक..

अमेरिकेचे अपोलो आणि रशियाच्या लुना या चांद्रमोहिमा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर ४० वर्षांनी चीनचे यान मातीच्या नमुन्यांसह परतले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस चँग-५ चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. विविध गोष्टींचे परीक्षण करण्यासाठी चीनचे यान अंतराळात झेपावलं होतं. यानाचा एक भाग चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी तिथे उतरला. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल, तिथल्या भौगोलिक स्थितीबद्दल, भूगर्भाबद्दल, इतिहासाबद्दल नव्याने काही कळू शकतं. चँग-५ यशस्वी परतणं हे चीनच्या अंतराळविश्वातल्या एक अविस्मरणीय घटना आहे. चंद्रावरून परतलेले हे यान इन्फ्रारेड कॅमेरे वापरणाऱ्या हेलिकॉप्टरांना दिसलं. यानाची ओळख पटल्यानंतर चीनने त्या बर्फाच्छादित भागात आपला ध्वज फडकावला. चीनमधल्या इनर मंगोलिया प्रदेशातल्या सिझिवांग भागात पॅराशूटच्या माध्यमातून ही कॅप्सूल पृथ्वीवर परतली. चीनचे अंतराळवीरही मोहीम फत्ते करून याच भागात उतरले होते. इन्फ्रारेड कॅमेऱ्यांनी कॅप्सूलच्या आगमनाने निर्माण झालेली उष्णता टिपत अचूक स्थान ओळखले.

या दशकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. रोबोटिक यान माणसांना घेऊन येणाऱ्या यानाआधी पाहणी करेल. चंद्र हा अनेक देशांना खुणावतो आहेचं, यापैकी काही मोहिमा राष्ट्रीय अवकाश संस्थांतर्फे हाती घेतल्या जातील तर काही खाजगी स्वरुपाच्या असतील. युकेतल्या अक्सेस स्पेस अलायन्स या कंपनीचे संचालक टोनी अझारली म्हणाले, येणारा काळ खूपच उत्साहवर्धक असेल. स्पेसबिट या कंपनीने चंद्रावर यान पाठवण्याची तयारी केली आहे. पहिल्यांदाच माणसासारखा दिसणारा, काम करणारा रोबो चंद्रावर जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. चंद्रावरून माणसं यशस्वीपणे परतल्यानंतरच या मोहिमांना चालना मिळू शकते असं त्यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या अपोलो आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या लुना या मोहिमांमध्ये चंद्रावरच्या पृष्ठभागावरचे ४०० किलो नमुने जमा करण्यात आले होते. पण हे नमुने खूप जुने होते. काही दशलक्ष वर्ष जुने. चँग-५ ने आणलेले एकदमच वेगळे असतील. चंद्राच्या उत्तर पश्चिमेकडचा मॉन्स रुमकर या ज्वालामुखीमय भागाकडे चीनने लक्ष केंद्रित केले होतं. या भागातल्या दगडांचे, मातीचे नमुने १.२, १.३ दशलक्ष वर्षांपेक्षा जुने असणार नाहीत. चंद्राची अंतर्गत रचना नेमकी कशी झाली याचा उलगडा या नमुन्यांद्वारे होऊ शकतो. सौर मंडळातल्या ग्रहांचे पृष्ठभाग किती वर्षांचे आहेत हे अधिक अचूकपणे कळू शकेल. अपोलो आणि सोव्हिएत लुनासंदर्भात हा संदर्भ महत्त्वाचा होता. चँग-५ येत्या काळातल्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण तपशील देऊ शकते, जेणेकरून सर्वाना चंद्रयांना बद्दल माहिती मिळू शकेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments