Thursday, February 25, 2021
Home International News अमेरिकेमध्ये पुन्हा कोरोनाचे तुफान, रुग्णसंख्या लाखात

अमेरिकेमध्ये पुन्हा कोरोनाचे तुफान, रुग्णसंख्या लाखात

अमेरिकेत कोरोना संसर्गाने भयानक रुप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासूनचे अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे खूपच वाढले आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत तब्बल ४ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४ लाख ३ हजार ३५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी ११ डिसेंबर रोजी अमेरिकेत एका दिवसातील आता पर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ११ डिसेंबरला अमेरिकेत २ लाख ४४ हजार ११ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आजचा आकडा किती मोठा आहे हे लक्षात येते आहे.

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्यांची संख्या २,७५६ इतकी असल्याचे सीडीएसने जाहीर केले आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेतच आढळून येत आहेत. आतापर्यंत १.७६ कोटींहून अधिक रुग्णांची अमेरिकेत नोंद झाली आहे. तर ३ लाख १५ हजार ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेत कोरोनावरील लस देण्याचं आपत्कालीन परिस्थितीत काम सुरुही झाले आहे. पण त्याचवेळी संक्रमणाचेही प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या एकूण कैद्यांपैकी प्रत्येक ५ कैद्यांमागे एक कैदी कोरोना पॉझिटीव्ह असल्याची आकडेवारीही निदर्शनास आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात असलेल्या अमेरिकेत ४ नोव्हेंबरपासून दररोज १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

सरासरीपेक्षा सुमारे एक चतुर्थांश जास्त मृत्यू मधुमेह, अल्झायमर, उच्चरक्तदाब, न्यूमोनिया सारख्या कारणांनीही झाले आहेत. ही माहिती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या आकडेवारीच्या न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या विश्लेषणातून दिसून आली आहे. वृत्तानुसार यातील काही मृत्यू अप्रत्यक्षपणे कोविड-१९ शी संबंधित असूही शकतात. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवरील वाढलेला ताण आणि इतर रुग्णांची आधीसारखी काळजी न घेतली गेली नाही. तसेच महामारीमुळे कुटुंबांची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्यानेही मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा मधुमेहाने होणारे मृत्यू सरासरीच्या तुलनेत १५ टक्के जास्त होते. अल्झायमरने १२% जास्त मृत्यू झाले. व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठात सोसायटी अँड हेल्थचे संचालक अॅमिरेट्स स्टीव्हन वूल्फ यांनी सांगितले की, औषधांवर खर्च करायचा की खाण्यावर वा डोक्यावरील छत टिकवून ठेवायचे यापैकी एकाची निवड करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक जण महामारीत स्वत:ला वाचवतील. मात्र महामारीमुळे त्यांच्या आरोग्य आणि उत्पन्नावर जो परिणाम झाला त्यामुळे भविष्यातही त्यांना त्रास होत राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments