Friday, February 26, 2021
Home International News फायजरच्या लसीबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था

फायजरच्या लसीबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था

अमेरिका, ब्रिटनने फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. फायजरच्या लस वापराने लसीकरण सुरू करण्यात आले असताना दुसरीकडे चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. फायजरची लस घेतल्यानंतर अनेकांना एलर्जीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. ही संख्या अंदाजापेक्षाही अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाची लस घेतल्यानंतर नागरिकांना एलर्जीचा त्रास का होतो, याबाबत अमेरिकन प्रशासनाचे लक्ष असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अॅण्ड इन्फेक्शन डिजीजच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लस आणि एलर्जीबाबत अभ्यास करण्यात येणार असून यामध्ये १०० जणांचा समावेश असणार आहे. यामध्ये विविध गोष्टींची एलर्जी असलेल्या व्यक्तिंचा समावेश असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये हे संशोधन, अभ्यास सुरू होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर मॉनसेफ स्लॅवोई यांनी सांगितले की, लसीमुळे लोकांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. इतर लशींच्या तुलनेत फायजरची करोना लस टोचल्यानंतर एलर्जी होत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेसह ब्रिटनमध्येही फायजरची लस दिल्यानंतर काहींना त्रास जाणवला होता. मात्र, काही तासांमध्ये त्यांची प्रकृती चांगली झाली. लस निर्मिती करणारी कंपनी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्यात या एलर्जीबाबत चर्चा सुरू आहे. एलर्जीचा त्रास होऊ नये यासाठी औषध घेणाऱ्या व्यक्तिंना लस कशी द्यायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लसीकरण सुरू झाल्यानंतर अमेरिकेतील अलास्का शहरात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे दिसून आले. लस दिल्यावर काही मीनिटातच आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होऊन तब्येत खालावली होती. हे दोघेही आरोग्य कर्मचारी एकाच रुग्णालयात कार्यरत होते. त्याचप्रमाणे लस देण्यात आलेल्या एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याला आधीपासून अॅलर्जीचा कोणताही त्रास नव्हता. लस दिल्यानंतर अवघ्या दहा मीनिटातच तिची तब्येत खालावू लागली, अशी माहिती बार्टलेट रिजनल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याने दिली. महिलेचा चेहरा तसेच गालावर पुरळ दिसू लागले. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ श्वास घ्यायलाही त्रास होत होता. या महिला कर्मचाऱ्याला सर्वप्रथम अॅलर्जीवरील एपिनेफ्राइनची मात्रा देण्यात आली. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील पुरळ कमी झाले. परंतु थोड्याच वेळात पुन्हा पुरळ दिसू लागले. परंतू, थोड्या काळाने पुन्हा चेहऱ्यावर अलर्जी दिसून येऊ लागली, त्यामुळे लसीबद्द्ल पुन्हा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments