Friday, February 26, 2021
Home International News जागतिक आरोग्य संघटनेने जारी केला नवा आदेश

जागतिक आरोग्य संघटनेने जारी केला नवा आदेश

सध्या देश कोरोना व्हायरसच्या दुसरी लाट येण्याच्या टप्प्यात असल्याचं निदर्शनात येत आहे. कोरोन विषाणूची साथ पुन्हा अधिक फैलावू लागली आहे. जगभरातल्या अनेक राष्ट्रांत त्याची लागण झालेले लोक सापडताहेत. एकूण बाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या देशांची प्रशासन उपाययोजना सुद्धा करत आहेत. परंतु या आजाराला औषधही नाही, लसही अद्याप उपलब्ध झालेली नाही, कोरोनामुळे मृत्युचं होतो या साऱ्या बातम्या ऐकून लोक भयभीत होत आहेत. या २१ व्या शतकात संगणकाची बटणं दाबली, माउस फिरवला किंवा मोबाईल आयकॉन क्लिक केले, की झटकन काम होण्याची सवय लागलेल्या लोकांना सतत हात धुवा, मास्क वापरा, सोशल डीस्टन्सिंग, गर्दीत जाऊ नका या सूचना पाळणं जरा कठीणच जाते आहे.

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात सूचना देण्यात आल्या आहेत की, ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे १२  वर्ष किंवा त्याहून जास्त वयाचे विद्यार्थी आणि मुलांसह सर्वांनी फेस मास्कचा वापर करावा. दुकानं, ऑफिस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एअर एक्झॉस्टची व्यवस्था खराब असल्यामुळे फेस मास्कचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितंल की, फेस मास्क व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सुरक्षित आहे. तसेच त्याचसोबत इतर सुरक्षात्मक उपाय जसं हात स्वच्छ ठेवण्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. गाइडलाइन्समध्ये सांगितल्यानुसार हेल्थ केअर वर्कर्स, जे कोरोना रुग्णांची काळजी घेतात, त्यांनी N95 मास्कचा वापर करावा. जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे की, शारीरिक परिश्रमाची कामं करताना लोकांनी मास्क वापरू नये. त्यामुळे श्वास गुदमरणे, अस्थमा किंवा श्वासाशी निगडीत आजार होण्याचा धोका संभवतो. गाईडलाइन्सनुसार, अशी ठिकाणे जिथे एअर एक्झॉस्टची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी घरांमध्येही पाहुणे आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा. तसेच एअर एक्झॉस्टची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी गर्दी असेल तर फेस मास्क वापरावा.

शक्यतो घरात जर लहान मुल अथवा वयोवृद्ध मंडळी असतील तर तुम्ही कोणाकडे जाणे अथवा तुमच्या घरी कोणाला बोलवणे टाळलेलच योग्य ठरेल. जेणे करून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती राहणार नाही. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने फेस मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे, आणि ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments