कोरोनाच्या काळात जगातल्या अनेक देशांत विमान प्रवासाला बंदी आली. दुसऱ्या देशांतील नागरिकांना आपल्या देशात प्रवेश करण्यास जवळपास सर्वच देशांनी बंदी घातली. आता परिस्थिती सामान्य होण्यास सुरुवात झाली आहे. देशोदेशी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे Vaccine Passport हा शब्द सध्या कानावर मोठ्या प्रमाणात पडत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जगातले सर्वच गोष्टींमध्ये बदल करावा लागला आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेलाही याचा चांगलाच फटका बसला आहे. आता जगातले प्रमुख देश आणि मोठ्या कंपन्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्हॅक्सिन पासपोर्ट सुरु करण्याच्या विचारात आहेत.
जगभरात कोरोनाचा प्रसार हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या माध्यमातून झाला आहे असे मानलं जात आहे. कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना, अनुनासिक रक्तसंचय, वाहणारे नाक, घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत नाही. बहुतांश लोक विशेष उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना होणार्या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. जगभरात डिडिटलायझेशनची प्रक्रिया जलद गतीनं सुरु आहे. अशावेळी आपली माहिती वा डेटा लीक होण्याची शक्यता असते. सध्या फेसबुक, व्हॉट्स अप अशा सोशल मीडियामधून डेटा लीक होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे Vaccine Passport च्या डेटा सुरक्षेवर मोठी चर्चा केली जात आहे. अनेक देशांसमोर त्याच्या गोपनियतेचे आव्हान आहे. Vaccine Passport हे एखाद्या माहितीच्या स्वरुपात असेल की त्यासाठी एक अॅप तयार करण्यात येईल याची निश्चिती अजून झाली नाही.
एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्टची गरज असते. आता कोरोना सारख्या महामारीला थांबवण्यासाठी अमेरिकेसोबत अनेक देशांनी डिजिटल हेल्थ पासपोर्ट तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामधून समजेल की आपल्या देशात येणाऱ्या प्रवाशाने कोरोनाची लस घेतली आहे की नाही. याच डिजिटल पासपोर्टला Vaccine Passport असं म्हटलं जाते. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे की Vaccine Passport हा एक डिजिटल हेल्थ पासपोर्ट असेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्याची आरोग्याची स्थिती आणि त्याने कोरोनाची लस घेतली आहे की नाही याची माहिती मिळेल. अनेक कंपन्यांनी याच्या अॅपचे आणि सॉफ्टवेयर डिजाइनिंगचे काम सुरु केलं आहे. कॉम ट्रस्ट नेटवर्क आणि आयबीएम सारख्या कंपन्यांनी या आधीच Vaccine Passport वर काम पूर्ण केलं आहे असे समजते.