Monday, March 1, 2021
Home International News डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार

ट्रम्प यांच्यावर आठवडाभरापूर्वी संसदेत हल्ला करण्यासाठी समर्थकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांच्या व्हीडिओमुळे हिंसाचार होऊ शकतो यामुळे आता यूट्युबनेही त्यांचं अकाऊंट २० जानेवारी पर्यंत बंद केलं आहे. या आधी ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकने आणि इन्स्टाग्रामनेही २० जानेवारी पर्यंत ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की निर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमापर्यंत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करु शकणार नाहीत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाब वाढवला आहे. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय की अमेरिकन कायदा कोणत्याही शक्तिशाली व्यक्तिच्या बचावासाठी नाही. जो बायडेन म्हणाले की, “अमेरिकन राष्ट्रपती कायद्यापेक्षा मोठे नाहीत. न्याय हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे, कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीच्या बचावासाठी नाही.”

महाभियोग चालवण्यासाठी २१८ मतांची गरज असते. हा प्रस्ताव संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये पाठवला जाईल. पण सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडे बहुमत नाही. २५ व्या घटनादुरुस्तीचा वापर करून ट्रम्प यांना पदावरून हटवण्यास उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी नकार दिलाय. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवून पदावरून हटवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आग्रही आहेत.  अमेरिकेच्या संसदेत समर्थकांनी घातलेल्या गोंधळाप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. महाभियोग प्रस्तावावर संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आज मतदान झाले. सभागृहात २१५ पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि ५ रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिले आहे.

दरम्यान २३२  लॉ मेकर्स मध्ये १० रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील महाभियोगाला पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर केला आहे. हा महाभियोग प्रस्ताव दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांना मुदतपूर्वच सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे. हा प्रस्ताव सध्या कनिष्ट सभागृहात मंजुर झाला आहे. तो सिनेटमध्येही मंजूर झाल्यास ट्रम्प यांना मुदतपूर्व पद सोडावे लागणार आहे. ट्रम्प यांच्याविरोधात यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यांच्यावर त्यावेळेस २ आरोप होते. पहिला, युक्रेनवर २०२० च्या निवडणूकीसाठी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहणारे, जो बायडेन यांना बदनाम करण्यासाठी दबाब आणला होता. दुसर्‍या आरोपात असे म्हटले आहे की,  ते काँग्रेसला अडथळा आणत होते. पण त्यावेळेस त्यांना क्लिन चीट मिळाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments