Friday, February 26, 2021
Home International News डोनाल्ड ट्रम्प यांची टीवटीव केली कायमची बंद

डोनाल्ड ट्रम्प यांची टीवटीव केली कायमची बंद

युएस कॅपिटलवर ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आलेल्या गोंधळसदृश्य परिस्थितीने आणि त्यानंतर झालेल्या हिंसक वातावरणामुळे अशा प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी पुढील काळाबाबतची सावधगिरी म्हणून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी ट्विटरकडून हा निर्णय़ घेण्यात आला. युएस कॅपिटलम्ये झालेल्या खेदजनक घटनेनंतर लगेचच प्राथमिक स्वरुपात १२ तासांसाठी ट्रम्प याचं ट्विटर अकाऊंट निलंबित केलं होतं. शिवाय भडकावू ट्विट करण्याचं सत्र असंच सुरु राहिल्यास अकाऊंवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई केली जाऊ शकते, अशी तंबी त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. अखेरच त्यांची अंमलबजावणी आता करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, गुरुवारी ट्रम्प यांनी तात्पुरत्या बंदीच्या कारवाईनंतर ट्विटरवर पुनरागमन केलं होतं. इथं त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पुढं त्यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कालावधी संपुष्टात येत असल्याची बाब अधोरेखित केली होती. शिवाय शांततापूर्ण सत्तांतराकडेही त्यांनी लक्ष वेधलं. पण, जो बायडन यांच्या नव्या कारकिर्दीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या नसून, शपथविधीसाठी जाणार नसल्याचेही स्पष्ट संकेत दिले.

@realDonaldTrump या ट्विटर अकाऊंटवरील ट्वीटचं जवळून निरीक्षण केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्वीटरकरडून ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. यावेळी भविष्यात भडकावू ट्वीटमुळे अशा प्रकारची कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कारण देण्यात आले आहे. याआधी ट्विटरने १२  तासांसाठी डोनाल्ड ट्रंप यांचं अकाऊंट बंद केलं होतं. तेव्हाच खरंतर ट्वीटरकडून सांगण्यात आलं होतं की, ट्वीटरच्या नियमांचं उल्लंघन केल्यास ट्रंपना कायमचं निलंबित करण्यात येईल. डोनाल्ड ट्रंप हे ट्विटरचा वापर अगदी शस्त्राप्रमाणे करायचे. लोकांना सांगावयाची असलेली गोष्ट ते तातडीने ट्वीट करायचे. थोडक्यात व्यक्त होण्याचं ट्वीटरसारखं माध्यम त्यांना आवडत होतं. एका क्लिकवर कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेलं माध्यम म्हणजे त्यांच्यासाठी ट्वीटर हेच होते. परंतु, सारखी चुकीची माहिती पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणे आणि हिंसेसाठी प्रवृत्त करणं यामुळे ही कारणे लक्षात घेता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून निलंबन केलं जातं. ट्रंप यांच्या निलंबनामागे यातलचं काही कारणं आहेत.

६ जानेवारी २०२१ रोजी ट्रंप यांनी ट्वीट केले, त्यात त्यांनी कॅपिटोल हिल हिंसेतील समर्थकांना ‘देशभक्त’ म्हटलं होतं. या समर्थकांनी अमेरिकन काँग्रेसच्या इमारतीत अर्थात कॅपिटल इमारतीत घुसून तोडफोड आणि घोषणाबाजी केली होती. अमेरिकेतील संसदेवरील हल्ला आणि हिंसाचाराच्या घटनेमुळे जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच आता त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पाठोपाठ ट्विटरनेही त्यांचे अकाऊंट बंद केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांची सोशल मिडीयावरची टीवटीव कायमची बंद करण्याचा मोठा निर्णय ट्वीटरने घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments