Friday, February 26, 2021
Home International News इंग्लंडमध्ये पुन्हा सक्तीचे लॉकडाऊन

इंग्लंडमध्ये पुन्हा सक्तीचे लॉकडाऊन

इंग्लंड देशात तर पुन्हा एकदा नव्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सोमवारी सांगितले की, इंग्लंडमध्ये जवळपास ५६ मिलियन लोक संपूर्ण लॉकडाऊनमध्ये परततील. हा लॉकडाऊन येत्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असण्याची शक्यता आहे, असे जॉनसन यांनी म्हटले आहे.  बोरिस जॉनसन यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून पुन्हा सर्व शाळा बंद असतील. स्कॉटलंडकडून झालेल्या घोषणेनंतर जॉनसन यांनी ही घोषणा केली आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाव्हायरस पासून होणारा मृत्यू दर सर्वाधिक आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तीन चथुर्थांश लोक म्हणजे जवळपास ४४  मिलियन लोक या महामारीचा सामना करत आहेत. जॉनसन यांनी पुढे म्हटले आहे की, सोमवारी कोविड संक्रमण झालेल्यांची संख्या जवळपास २७,००० आहे. ही संख्या गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना लाटेत असलेल्या कोरोना संक्रमितांपेक्षा ४०% अधिक आहे. गेल्या मंगळवारी ८०,००० पेक्षा अधिक लोक केवळ २४ तासात संक्रमित झालेले आढळले आहेत. इंग्लंडमध्ये बहुतांश भागात अगोदरपासूनच प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच आहे की, या अडचणीच्या काळात लोकांना अधिक कठोर नियम पाळावे लागतील. या वेळीही लावण्यात आलेला लॉकडाऊन आगोदरच्या लॉकडाऊन प्रमाणेच आहे. अत्यावश्यक सेवा, महत्वाचे काम यासाठी लोक घराबाहेर पडू शकतात. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नाही, ज्यांना व्यायाम, वैद्यकीय सेवा सुविधा, कौटुंबीक हिंसाचार यांबाबत काही गरज असल्यास नागरिक घराबाहेर पडू शकतात, असेही जॉनसन यांनी म्हटले आहे.

देशातील अनेक ठिकाणी कडक निर्बंध असताना कोरोनाचा नवा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे अजून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन केला पाहिजे, असे बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. पहिल्या तीन महिन्यांच्या लॉकडाउन दरम्यान जे निर्बंध होते तेच यावेळी असतील असे बोरिस जॉन्सन यांनी यावेळी स्पष्ट केले. ब्रिटनमध्ये सर्वात प्रथम मार्च ते जून असे तीन महिने लॉकडाउन होता.

पंतप्रधान म्हणाले की, देशासाठी ही कठीण वेळ आहे. देशाच्या प्रत्येक भागात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. सध्या यूकेमध्ये शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद राहतील. ऑनलाईन वर्ग सुरू होतील. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरामध्येच रहावे लागेल आणि त्यांना फक्त आवश्यक कामांसाठी सोडले जाईल. उदाहरणार्थ, लोक आवश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर जाऊ शकतात, जर त्यांना घरून काम करणे अशक्य असेल तर ते कार्यालयात जाऊ शकतात. सलून बंदच राहतील आणि रेस्टॉरंट्स केवळ पार्सल सेवा उपलब्ध राहतील. कोरोना विषाणूचा नवा प्रकार जगातील इतर अनेक देशांमध्ये पोहोचला आहे, त्यामुळे यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments