Thursday, February 25, 2021
Home International News म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता प्रस्थपित

म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता प्रस्थपित

लोकशाही सरकार उलथवून लावणे आणि लष्कराची सत्ता प्रस्थापित करणे ही गोष्ट म्यानमारसाठी काही नवीन नाही. म्यानमारमध्ये या आधीही लष्कराची हुकुमशाही होती. त्या विरोधात प्रदीर्घ काळ लढा देऊन आंग सान सू ची यांनी लोकशाही मार्गाने सत्ता मिळवली होती. आता पुन्हा एकदा म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतली आहे. या सर्व घडामोडीवर भारताची बारीक नजर असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. म्यानमारमध्ये लोकशाही नसणं हे भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच त्या देशावर चीनचे वर्चस्व वाढण्याचीही शक्यता आहे.

म्यानमारमध्ये पुन्हा एकदा लष्करानं बंड केला आहे. लष्करानं सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या नेत्या आँग सान सू ची यांना लष्कराने अटक केली आहे. आंग सान सू ची यांच्या अटकेच्या काही तासांमध्येच लष्कारनं बंड केल्याचं जाहीर केलं आहे. तसंच म्यानमारमध्ये १ वर्षाची आणीबाणी लागू करण्यात आल्याचं टीव्हीवर जाहीर करण्यात आलं आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेत्याला लष्कराने अटक केल्यामुळे म्यानमारमध्ये बंड होण्याची भीती व्यक्त होते आहे. नोव्हेंबरमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक जागा जिंकल्या होत्या. मात्र ही मतं फेरफार करून मिळवल्याचं लष्कराचं म्हणणं होतं.

myanmar military

ब्रह्मदेश या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या म्यानमारमध्ये २०११ पर्यंत लष्कराचं राज्य होतं. आँग सान सू ची यांनी अनेक वर्षं नजरकैदेत घालवली आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार होतं. हे आता लांबणीवर टाकण्यात यावं अशी मागणी लष्करातर्फे करण्यात येत होती. संयुक्त राष्ट्र संघटनेनं त्या संदर्भात सुरक्षा परिषदेनं आज एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. लष्कराने सत्ता हातात घेताना राजधानी आणि इतर महत्वाच्या भागातील टेलिफोन आणि इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसेच सर्वात मोठं शहर असलेल्या यांगून या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

म्यानमारमध्ये लोकशाही सरकार उलथवून लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हाती घेतलीय. यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी म्यानमारवर आर्थिक निर्बंध लावण्याची धमकी दिली आहे. अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच अमेरिका म्यानमारवर आर्थिक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments