लॅरी किंग हे अमेरिकेतील एक प्रमुख मुलाखतकार आहेत. त्यांनी अध्यक्षांच्या मुलाखतींसह अनेक वर्तमानपत्रांच्या प्रमुख मुलाखतीही घेतल्या. लॅरी किंगला त्यांच्या कार्याबद्दल पीबॉडी अवॉर्ड देखील देण्यात आला आहे. लॅरी दीर्घ काळापासून आरोग्याशी संबंधित अडचणींशी लढत होते. यातून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न करत होते. असे म्हटले जात आहे की अलीकडच्या काही दशकात हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराशी त्यांना सामना करावा लागला आहे. टॉक शो होस्ट लॅरी किंग यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी त्यांच्या ट्विटर पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, दु:खद अंतकरणाने ओरा मीडियाने त्याचे सह-संस्थापक, यजमान आणि मित्र लॅरी किंग यांच्या निधनाची घोषणा केली. शनिवारी सकाळी लॉस एंजेलिसच्या सिडर-सिनाई मेडिसिन सेंटरमध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.
कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वाधिक अमेरिकेत आलेला दिसून आला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूची दोन कोटी केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, ८७ वर्षीय अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट लॅरी किंग यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. लॅरी किंग यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उपचारासाठी लॉस एंजेलिसच्या सिडर-सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या २ कोटींच्या पुढे गेली आहे. सध्या ८१ लाखांहून अधिक कोरोनाचे अॅक्टीव रुग्ण आहेत. येथे ८१ लाख ८४ हजारांहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर १ कोटी २३ लाखाहून अधिक कोरोना संसर्गीत रुग्ण उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहेत. अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३ लाख ५८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लॅरीच्या ६३ हजार मुलाखती, पुरस्कार आणि रेडिओ, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सादरीकरणे हे प्रसारक म्हणून त्यांच्या अद्वितीय प्रतिभेचा पुरावा आहेत. लॅरी नेहमीच त्यांच्या मुलाखतींचे विषयांना आपल्या कार्यक्रमांचे खरे स्टार म्हणून पाहत असत. ते स्वत:ला पाहुणे आणि प्रेक्षक यांच्यात नेहमीच निःपक्षपाती म्हणून पाहिलं आहे. त्यांच्या टेलीविजन शोनासुद्धा कमी कालावधीत मोठ्या प्रमाणत प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे एक अनुभवी आणि प्रसिद्ध मुलाखतकार म्हणून त्यांची ख्याती होती.