Saturday, March 6, 2021
Home International News बायडन प्रशासनाचा भारताबद्दल महत्वाचा निर्णय

बायडन प्रशासनाचा भारताबद्दल महत्वाचा निर्णय

बायडन प्रशासनाच्या स्थापनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बरेच बदल घडवून आणले आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेला सामर्थ्य देण्यासाठी अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादनांना नागरीकांनी प्राधान्य द्यावे असे त्यांनी सुचवले आहे. त्यांनी आज बाय अमेरिकन नियम आणखी कडक केले असून विदेशातून आयात वस्तुंचा वापर वाढण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठीच्या आदेशावरही बायडेन यांनी स्वाक्षरी केली आहे. ज्याप्रमाणे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरचा नारा दिला आहे त्याचप्रमाणे बायडन प्रशासनही आत्मनिर्भयतेकडे वळत आहे. त्यांनी आपल्या व्हाइट हाउसच्या व्यवस्थापन कार्यालयात डायरेक्‍टर ऑफ मेड ईन अमेरिका हे नवीन पदही स्थापन केले असून त्यांना अमेरिकन उत्पादनांचा खप आणि उत्पादन वाढवण्याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र अजूनही भारत लेवल ४ वर आहे. यामुळे भारतात प्रवास करणं धोकादायक आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर जीवाला धोका आहे. यामुळे अमेरिकेतील नागरिकांना तेथे जावू नये. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना अफगाणिस्तानमध्येही प्रवास करण्यास बंदी केली आहे.’ अमेरिकेने नव्या सरकारद्वारे प्रवास सल्ला जाहीर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये भारताचाही त्यांनी उल्लेख केला आहे. जो बायडन प्रशासनाने आपल्या नागरिकांना सांगितलं आहे की, सद्य परिस्थितीत नागरिकांना भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये जाण्याचा प्रवास टाळला पाहिजे. प्रवासाच्या सल्ल्यात सांगितलं आहे की, कोरोना महामारी आणि दहशतवाद या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे या देशांमध्ये प्रवास करताना पुर्नविचार करावा, तसेच सरकार इतर काही देशांमध्ये प्रवास करण्यावर बंदी आणण्याच्या तयारीत आहे.

बायडन प्रशासनाने आपल्या नागरिकांना दहशतवाद आणि याच्याशी निगडीत सुरू असलेला संघर्ष या वादावरून भारत-पाकिस्तान सीमेच्या लगद असलेल्या भागांमध्ये जाण्यास मनाई केली आहे. प्रशासनाने भारत-पाकिस्तान सीमेवर प्रवास करण्यास बंदी आणली आहे. दक्षिण एशियातील चार देशांबाबत ट्रॅव्हल एडवाइजरी अपडेट करताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून वेगवेगळे सल्ले देण्यात आले. यामध्ये कोविड, दहशतवाद आणि जातीय हिंसावादामुळे पाकिस्तानात प्रवास करताना विचार करावा. अमेरिकेतील नागरिकांना दहशतवाद आणि अपहरणाच्या घटना लक्षात घेता बलूचिस्तान आणि खैबर प्रांतात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. नवीन प्रशासनाने घेतलेले नवीन निर्णय नक्कीच अमेरीकावासियांसाठी फायद्याचे ठरतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments