Friday, February 26, 2021
Home International News भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची नासाच्या कार्यकारी प्रमुख पदी वर्णी

भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची नासाच्या कार्यकारी प्रमुख पदी वर्णी

नासाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, भव्या लाल या सर्व बाबतीत पदासाठी पात्र आहेत. त्यांच्याकडे अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा अनुभव आहे. भव्या लाल नासाच्या बजेट आणि आर्थिक सल्लागारसुद्धा राहिल्या आहेत. तसंच त्यांनी नासाच्या इनोव्हेटिव अॅडव्हान्स्ड कन्सेप्ट्स प्रोग्रॅम आणि नासा अॅडव्हायझरी काऊंसिलच्या व्यवस्थापनात काम केलं आहे. २००५ ते २०२० पर्यंत त्या सायंस एंड टेक्नोलॉजी पॉलिसी इंस्टीट्यूटच्या डिफेंस एनालिसिस शाखेत सदस्य आणि संशोधक म्हणून काम पाहिले आहे. निवदेनात पुढे म्हटले आहे की स्पेस टेक्नोलॉजी, स्पेस स्ट्रॅटेजी अँड पॉलिसीमध्ये चांगला अनुभव असण्या सोबतच त्यांनी व्हाइट हाउसमध्ये पॉलिसी आणि नॅशनल स्पेस काउंसिलमध्येही काम केले आहे. भव्या यांना डिपार्टमेंट ऑफ डिफेंस आणि स्पेस इंटेलिजेंस कम्युनिटीचीही माहिती आहे.

भव्या यांनी मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून इंजीनियरिंग केली. यानंतर पब्लिक पॉलिसी अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. अमेरिकी न्यूक्लियर सोसायटी आणि इमर्जिंग टेक्नोलॉजी संबंधीत दोन सरकारी कंपन्यांनी भव्या यांना अॅडवायजर म्हणून बोर्डात जागा दिली होती. एस्ट्रोनॉट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांच्या सांगण्यावरुन फेरबदल करण्यात आले होते. भारतीय-अमेरिकी भव्या लाल यांना अमेरिकी स्पेस एजेंसी नासाचे अॅक्टिंग चीफ ऑफ स्टाफ म्हणजेच कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना अवकाश एजन्सीमध्ये काही बदल आणि पुनरावलोकने करायची आहेत. म्हणूनच त्यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी भव्या यांच्यावर दिली आहे. भव्या मुळात अंतराळ वैज्ञानिक आहे. त्या बायडेन यांच्या ट्रांजिशन टीममध्येही राहिल्या आहेत.

नासा संस्थेत उच्च पदावरील नियुक्ती केल्या आहेत. भव्या लाल या संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्त करण्यात येत आहेत. फिलीप थॉम्पसन व्हाईट हाऊसचे समन्वयक,  मार्क एटकिंड संस्थेच्या ऑफिस ऑफ कम्युनिकेशन मध्ये सहायक प्रशासक आणि जॅक मॅकगिनस यांना प्रेस सचिव या पदांवर नियुक्त करण्यात आलं आहे. त्याशिवाय एलिसिया ब्राऊन आणि रिगन हंटर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती नासाकडून देण्यात आली आहे. भव्या यांनी सलग दोन वेळा नॅशनल ओसियानिक अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीला लीड केले आहे. नासामध्ये त्या यापूर्वी अॅडवायजरी काउंसिल मेंबर राहिल्या आहेत. स्पेस रिचर्सच्या प्रकरणात अमेरिकेची मोठी कंपनी C-STPS LLC मध्येही भव्या यांनी काम केले आहे. यानंतर त्या याच्या प्रेसिडेंटही राहिल्या आहेत. यानंतर त्यांना व्हाइट हाउसमध्येही स्पेस इंटेलिजेंस कमिटीचे मेंबर बनवण्यात आले होते. अंतराळ क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल भव्या लाल यांना इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्सकडून गौरवण्यात आलं होतं, अशी माहिती नासाने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments